मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ७२० दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:06 AM2021-06-20T04:06:26+5:302021-06-20T04:06:26+5:30
मुंबई - मुंबईत दिवसभरात ६९६ नवे कोरोना रुग्ण तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात ...
मुंबई - मुंबईत दिवसभरात ६९६ नवे कोरोना रुग्ण तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सध्या मुंबईत सध्या १४,७५१ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून, तो ७२० दिवसांवर पोहोचला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. गुरुवारी ६६६, शुक्रवारी ७६२, तर ६९६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आतापर्यंत ७,२०,६३७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, १५,२७९ जणांचा मृत्यू झाला. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के इतके असून ६,८८,३४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत १८ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर ८२ इमारती सील करण्यात आल्या आहेत.