मुंबई : नेहमी झगमगाटात असलेल्य़ा देशाच्या आर्थिक राजधानीची आज बत्ती गुल झाली. यामुळे लोकल सेवा, पेट्रोल पंप आदींची वीज गेल्याने ठप्प झाले होते. यामुळे मुंबई महापालिकेने अत्यावश्यक मदतीसाठी हेल्पलाीन नंबर जारी केले असून अनेक स्थानकांजवळच निवाऱ्याची सोयगी करण्यात आली आहे.
400 केव्हीचा पडघा फिडर सुरु करण्यात आला असून 220 केव्हीचे मुलुंड आणि सिमेन्स लाईनचे फिडर सुरु झाले आहेत. कळव्यातील 400 केव्हीचा फिडर बंद आहे. यामुळे ठाणे, नवी मुंबईसह आसपासच्या भागाची वीज गायब झाली होती. यामुळे मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी 022-22694727, 022-226947725, 022-22704403 हे इमरजन्सी नंबर जारी केले आहेत.
मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. या सगळ्याच शहरांमधील वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. विद्यापीठ विभागाच्या व आयडॉल परीक्षा १८ तारखेपर्यंत नाहीत. मात्र, महाविद्यालयीन स्तरावरच्या परीक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा यंदा क्लस्टर पद्धतीने होत असल्यानं लीड महाविद्यालय आणि त्यातील इतर महाविद्यालयं ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेत आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे विशेषतः ११ ते १२ या वेळेतील आणि पुढील सत्रातील परीक्षा रद्द केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.