Mumbai Electricity Cut : SNDT विद्यापीठाने विद्यार्थिनींना परीक्षेसाठी वाढवून दिली वेळ, जाणून घ्या कधीपर्यंत देता येणार पेपर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 01:38 PM2020-10-12T13:38:30+5:302020-10-12T13:43:35+5:30

Mumbai Electricity Cut : एसएनडीटी विद्यापीठाकडून आजच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या नसल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थिनींना परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. 

Mumbai Electricity Cut: Extended time for SNDT students for exams | Mumbai Electricity Cut : SNDT विद्यापीठाने विद्यार्थिनींना परीक्षेसाठी वाढवून दिली वेळ, जाणून घ्या कधीपर्यंत देता येणार पेपर

Mumbai Electricity Cut : SNDT विद्यापीठाने विद्यार्थिनींना परीक्षेसाठी वाढवून दिली वेळ, जाणून घ्या कधीपर्यंत देता येणार पेपर

googlenewsNext

मुंबई - मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. या सगळ्याच शहरांमधील वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. एसएनडीटी विद्यापीठाकडून आजच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या नसल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थिनींना परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. 

आज परीक्षांच्या वेळा 6 वाजेपर्यंत विद्यार्थिनींना वाढवून देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा संचालकांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थिनी आजच्या दिवसातील परीक्षा या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधीही देऊ शकणार आहेत. मुंबई विभागातील सर्व परीक्षा पुढे ढकलल्याचा मेसेज व्हायरल दरम्यान सोमवारी सकाळपासून खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे मुंबई विभागातील अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्यापीठाकडून अद्याप असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसून निर्णय घेतलाच तर तो अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai Electricity Cut : सीईटीच्या परीक्षेलाही फटका! परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना हवी आणखी एक संधी

खंडित झालेल्या वीज पुरवठ्याचा परिणाम जनजीवन विस्कळीत करणारा ठरला असून सोमवारी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा आणि इतर परीक्षांना त्याचा मोठा फटका बसला आहे. वीज पुरवठ्या अभावी मुंबई मधील रेल्वेसेवा ही खंडित झाली आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देणे शक्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहे. रेल्वेसेवा खंडित झाल्याने अनेक विद्यार्थी आपापल्या केंद्रावर वेळेवर पोहचू शकले नाहीत. याची दखल घेऊन सदर परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांकरता पुर्नपरीक्षेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी देण्यात यावी अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी पत्राद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. उचित कार्यवाही करुन संबंधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Mumbai Electricity Cut : केसी महाविद्यालयाने परीक्षा पुढे ढकलल्या, 'या' दिवशी होणार पेपर

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज अनेक विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा आहे. मात्र वीज पुरवठा खंडित असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याच दरम्यान केसी महाविद्यालयाने परीक्षा पुढे ढकलल्या असल्याची माहिती मिळत आहे. केसी महाविद्यालयाने सर्व यूजी आणि पीजी परीक्षा या रविवारी (18 ऑक्टोबर) रिशेड्यूल केल्याची माहिती दिली आहे. इतर महाविद्यालयांच्या बाबतीतही असाच निर्णय घेण्याची मागणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. मुंबईतील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने अंतिम वर्षाच्या आजच्या परीक्षा रद्द करून त्यांचे पुनर्नियोजन करण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडन्ट्स वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आली आहे.

Web Title: Mumbai Electricity Cut: Extended time for SNDT students for exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.