Mumbai Electricity Cut : सीईटीच्या परीक्षेलाही फटका! परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना हवी आणखी एक संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 01:05 PM2020-10-12T13:05:10+5:302020-10-12T13:24:01+5:30
Mumbai Electricity Cut : वीज पुरवठ्या अभावी मुंबई मधील रेल्वेसेवा ही खंडित झाली आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देणे शक्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहे.
मुंबई - खंडित झालेल्या वीज पुरवठ्याचा परिणाम जनजीवन विस्कळीत करणारा ठरला असून सोमवारी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा आणि इतर परीक्षांना त्याचा मोठा फटका बसला आहे. वीज पुरवठ्या अभावी मुंबई मधील रेल्वेसेवा ही खंडित झाली आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देणे शक्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहे.
रेल्वेसेवा खंडित झाल्याने अनेक विद्यार्थी आपापल्या केंद्रावर वेळेवर पोहचू शकले नाहीत. याची दखल घेऊन सदर परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांकरता पुर्नपरीक्षेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी देण्यात यावी अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी पत्राद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. उचित कार्यवाही करुन संबंधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
Mumbai Electricity Cut : वीज पुरवठा खंडित झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण https://t.co/VRn3SR4zHh#Mumbaipowercut#mumbaipoweroutage#Mumbai#electricity#Exam#student
— Lokmat (@MiLOKMAT) October 12, 2020
मुंबई विभागातील सर्व परीक्षा पुढे ढकलल्याचा मेसेज व्हायरल दरम्यान सोमवारी सकाळपासून खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे मुंबई विभागातील अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्यापीठाकडून अद्याप असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसून निर्णय घेतलाच तर तो अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांची आजची ऑनलाईन परीक्षा हुकली आहे. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी देण्यात येईल असे आश्वासन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक विनोद पाटील यांनी दिली असल्याची माहिती महाराष्ट्र स्टुडन्ट्स असोसिएशनचे सिद्धार्थ इंगळे यांनी दिली.
Mumbai Electricity Cut : केसी महाविद्यालयाने परीक्षा पुढे ढकलल्या, 'या' दिवशी होणार पेपर
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज अनेक विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा आहे. मात्र वीज पुरवठा खंडित असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याच दरम्यान केसी महाविद्यालयाने परीक्षा पुढे ढकलल्या असल्याची माहिती मिळत आहे. केसी महाविद्यालयाने सर्व यूजी आणि पीजी परीक्षा या रविवारी (18 ऑक्टोबर) रिशेड्यूल केल्याची माहिती दिली आहे. इतर महाविद्यालयांच्या बाबतीतही असाच निर्णय घेण्याची मागणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. मुंबईतील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने अंतिम वर्षाच्या आजच्या परीक्षा रद्द करून त्यांचे पुनर्नियोजन करण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडन्ट्स वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आली आहे.
वीज खंडित झाल्यानं विद्यार्थ्यांना फटका; ऑनलाईन शिक्षणात अडथळा. संबंधित बातमीसाठी क्लिक करा -https://t.co/p5CnAZlO1u#BreakingNews#LatestUpdatespic.twitter.com/EVzrWSIdyS
— Lokmat (@MiLOKMAT) October 12, 2020