Mumbai Electricity Cut: तब्बल अडीच तासानंतर मुंबईच्या काही भागातील वीजपुरवठा सुरळीत; लोकलही धावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 12:59 PM2020-10-12T12:59:08+5:302020-10-12T16:17:47+5:30

Mumbai Power cut: सर्किट २मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई व ठाणे मधील बहुतांश भागात याचा फटका बसला आहे.

Mumbai Electricity Cut: power supply in Mumbai was started slowly, local train started | Mumbai Electricity Cut: तब्बल अडीच तासानंतर मुंबईच्या काही भागातील वीजपुरवठा सुरळीत; लोकलही धावल्या

Mumbai Electricity Cut: तब्बल अडीच तासानंतर मुंबईच्या काही भागातील वीजपुरवठा सुरळीत; लोकलही धावल्या

Next

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईला आज वीज गाय़ब झाल्याने मोठा फटका बसला. एकाचवेळी वेगवेगळ्या कंपन्यांच्या फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल अडीच तासानंतर मुंबईतील विविध भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यास प्रशासनाला यश आले. 



'महापारेषणच्या ४०० KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्कीट २ वर होता. मात्र सर्किट २मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई व ठाणे मधील बहुतांश भागात याचा फटका बसला आहे. तो अवघ्या अर्धा-पाऊण तासांत पुन्हा सुरळीत होईल. आमचे विद्युत कर्मचारी तिथं युद्धपातळीवर काम करत आहेत. लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मुंबईच्या काही भागात 10 मिनिटांत वीज आली होती. मात्र, दक्षिण मुंबईसह अन्य भागात वीज पुरवठा हळूहळू पूर्वपदावर आला. 



दरम्य़ान वीज गेल्याने तीन्ही रेल्वे मार्ग ठप्प झाले होते. यामुळे या काळातील काही रेल्वे अन्य स्थानकांवरून धावणार आहेत. तसेच सव्वा दोन तासांनी हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरु झाली. यानंतर मध्य रेल्वेवरील लोकल सेवाही सुरु झाली. काही वेळा पूर्वी पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवाही सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मुंबईची वीज गेल्याच्या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. 



मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. या सगळ्याच शहरांमधील वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. विद्यापीठ विभागाच्या व आयडॉल परीक्षा १८ तारखेपर्यंत नाहीत. मात्र, महाविद्यालयीन स्तरावरच्या परीक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा यंदा क्लस्टर पद्धतीने होत असल्यानं लीड महाविद्यालय आणि त्यातील इतर महाविद्यालयं ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेत आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे विशेषतः ११ ते १२ या वेळेतील आणि पुढील सत्रातील परीक्षा रद्द केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. 

Web Title: Mumbai Electricity Cut: power supply in Mumbai was started slowly, local train started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.