Join us

‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’-अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 2:43 AM

सीलिंकच्या जवळ असलेल्या कास्टिंग यार्डच्या ठिकाणी लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारण्याचा विचार एमएसआरडीसीने यापूर्वी केलेला होता.

मुंबई : लंडन आयच्या धर्तीवर मुंबई एका नजरेत बघता येईल असे मुंबई आय वरळी सीलिंकजवळ उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.

लंडनमध्ये थेम्स नदीच्या काठी सर्वात उंच आणि मोठा पाळणा असून त्यातून लंडन शहर बघता येते. जगभरातून लंडनमध्ये जाणाऱ्या पर्यटकांचे ते आकर्षण केंद्र आहे. त्याच धर्तीवर वरळी सीलिंकच्या वांद्रेकडील बाजूला मुंबई आयची उभारणी केली जाईल, असे पवार यांनी सांगितले.

सूत्रांनी सांगितले की राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबई आयची उभारणी केली जाईल. राज्याचे नवे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. ते या प्रकल्पासाठी किती पुढाकार घेतात हेही महत्त्वाचे ठरेल.याआधी बारगळला होता प्रकल्पसीलिंकच्या जवळ असलेल्या कास्टिंग यार्डच्या ठिकाणी लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारण्याचा विचार एमएसआरडीसीने यापूर्वी केलेला होता. त्यासाठी निविदा प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली होती. तथापि, हा प्रकल्प व्यवहार्य ठरणार नाही असे लक्षात आल्यानंतर तो प्रकल्प बारगळला होता.

टॅग्स :अजित पवार