Join us

ऐकून थक्क व्हाल! मुंबईत एका कुटुंबाने 240 कोटी मोजून विकत घेतले चार फ्लॅट, प्रति स्क्वेअर फुट मोजले इतके लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 1:13 PM

मुंबईत सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी असताना दक्षिण मुंबईत रेसीडेन्शीअल प्रॉपर्टी खरेदीचा एक मोठा एक व्यवहार झाला आहे. अलीकडच्या काळातील निवासी संपत्ती खरेदी करण्याचा हा एक मोठा व्यवहार आहे.

ठळक मुद्देनेपेंन्सी रोडवर रुनवाल ग्रुपकडून एक एका आलिशान टॉवरचे बांधकाम सुरु आहे. या चार फ्लॅटसबरोबर तपारीया कुटुंबाने कार पार्किंगचे 28 स्लॉटसही विकत घेतले आहेत.

मुंबई - मुंबईत सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी असताना दक्षिण मुंबईत रेसीडेन्शीअल प्रॉपर्टी खरेदीचा एक मोठा एक व्यवहार झाला आहे. अलीकडच्या काळातील निवासी संपत्ती खरेदी करण्याचा हा एक मोठा व्यवहार आहे. नेपिअन्सीरोडवर उभ्या राहणाऱ्या टॉवरमध्ये एका कुटुंबाने 240 कोटी रुपये मोजून चार फ्लॅट विकत घेतले आहेत. तापारीया कुटुंबाने रुनवाल ग्रुपकडून 28 ते 31 मजल्या दरम्यानचे चार फ्लॅटस विकत घेतले आहेत. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नेपिअन्सी रोडवर रुनवाल ग्रुपकडून एक एका आलिशान टॉवरचे बांधकाम सुरु आहे. प्रत्येक फ्लॅटचा कारपेट एरिया 4500 स्कवेअर फिटचा असून फ्लॅट खरेदी करताना प्रति स्क्वेअर फुट 1.2 लाख रुपये मोजले आहेत. मागच्या महिन्यात हा व्यवहार झाला. किलाचंद हाऊसजवळ हा टॉवर उभा राहत आहे. तीन वर्षांपूर्वी तपारीया कुटुंबाने त्यांची फॅमी केअर कंपनी 4,600 कोटी रुपयांना विकली. 

या चार फ्लॅटसबरोबर तपारीया कुटुंबाने कार पार्किंगचे 28 स्लॉटसही विकत घेतले आहेत. दोन वर्षांपूर्वी तपारीया कुटुंबाने बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये 11 हजार स्केवअर फुटचा डयुप्लेक्स फ्लॅट विकत घेतला. नेपेन्सी रोडच्या ज्या प्लॉटवर रुनवाल ग्रुपचा  35 मजली आलिशान टॉवर उभा राहत आहे तिथे 1918 साली बांधलेला एक दोन मजली बंगला होता. 

2011 साली रुनवाल ग्रुपने 350 कोटी रुपये मोजून हा बंगला विकत घेतला. या बंगल्याचे मालक कपाडिया कुटुंबाला 270 कोटी रुपये मिळाले. पण याच बंगल्यामध्ये लिलानी कुटुंब भाडेकरु म्हणून राहत होते. त्यांनी जागा रिकामी करण्यासाठी 80 कोटी रुपयाची मागणी केली होती. दक्षिण आणि मध्य मुंबईतील रिअल इस्टेट बाजारपेठ थंड पडलेली असताना हा व्यवहार झाला आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           

टॅग्स :बांधकाम उद्योग