Join us

शेतकऱ्यांचं आंदोलन हा 'पब्लिसिटी स्टंट'; रामदास आठवले यांचं खळबळजनक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 10:13 AM

मुंबईतील आझाद मैदानात दाखल झालेले शेतकरी आज राजभवनाच्या दिशेनं कूच करणार असून शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन सादर करणार आहेत.

ठळक मुद्देमुंबईतील शेतकरी आंदोलनाबाबत रामदास आठवलेंचं मोठं विधानमोदी हे शेतकऱ्यांच्या फायद्याचाच विचार करत असल्याचं केलं वक्तव्यशेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यायला हवं, असंही आठवले म्हणाले.

नव्या कृषी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी खळबळजनक विधान केलं आहे. 

"मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही", असं मोठं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. 

Live: मुंबईतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सर्व अपडेट्स 

मुंबईतील आझाद मैदानात दाखल झालेले शेतकरी आज राजभवनाच्या दिशेनं कूच करणार असून शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन सादर करणार आहेत. विशेष म्हणजे, या आंदोलनाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या आंदोलनात शरद पवार देखील सामील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आंदोलनाची गरज नसल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

"केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. कायदा सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला आहे. मुंबईतील आंदोलन हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण मोदी काही शेतकरी विरोधी नाहीत. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्नच नाही. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या ऐकून त्यानुसार काम देखील केलं गेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं", असं रामदास आठवले म्हणाले. 

जवळपास २० हजार शेतकरी मुंबईतनाशिकहून मुंबईत दाखल झालेल्या किसान सभेच्या मोर्चात तब्बल २० हजार शेतकरी सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना, शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :रामदास आठवलेशेतकरीकिसान सभा लाँग मार्च