उद्यापासून रंगणार 'मुंबई फेस्टिव्हल'; विविध कार्यक्रमांचे आयोजन, CM शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 05:45 PM2024-01-19T17:45:14+5:302024-01-19T17:46:59+5:30

टाटा मुंबई मॅरेथॉनचे २१ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजन केले आहे.

'Mumbai Festival' will be held from tomorrow; Organized various programs, inaugurated by CM Eknath Shinde | उद्यापासून रंगणार 'मुंबई फेस्टिव्हल'; विविध कार्यक्रमांचे आयोजन, CM शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

उद्यापासून रंगणार 'मुंबई फेस्टिव्हल'; विविध कार्यक्रमांचे आयोजन, CM शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत मुंबईमध्ये २० ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता  क्रॉस मैदान गार्डन, चर्चगेट येथे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

शारदा विद्यालयातर्फे लेझीम सादरीकरण, नृत्यांगना सुप्रिया सेन यांचा ओडिशी नृत्याचा कार्यक्रम, मुंबई फेस्ट‍िवल थीम साँग, मराठी आणि हिंदी काव्यवाचन कार्यक्रमात अभिनेते अनुपम खेर, सचिन खेडेकर यांचा सहभाग असेल. अभिनेत्री सारा अली खान यांचा नृत्याचा कार्यक्रम, धारावी ड्रीम प्रोजेक्ट कार्यक्रम सादरीकरण होणार असून मराठी अभिनेते अमेय वाघ आणि हिंदी अभिनेत्री मिनी माथूर या कार्यक्रमाचे निवेदन करतील. या फेस्टिवलला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे.

'मुंबई फेस्टिव्हल २०२४' मध्ये विविध कार्यक्रम

'मुंबई फेस्टिव्हल २०२४' मध्ये विविध उपक्रम होतील. यामध्ये मुंबईतील विविध ठिकाणी १९ ते २१ जानेवारी आणि २६ आणि २८ जानेवारी रोजी ‘शॉपिंग फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. काळा घोडा येथे २० ते २८ जानेवारी रोजी कला महोत्सव होईल. बीच फेस्ट २० जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान असून यामध्ये योगा, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बीच क्लीन अप आणि स्क्रिनिंग असे विविध उपक्रम जुहू चौपाटी येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होईल. सिनेमा फेस्ट २० ते २४ जानेवारी दरम्यान असून सायंकाळी ७ वाजता पीव्हीआर चित्रपटगृहांमध्ये मुंबईत विविध शोंचे आयोजन केले आहे. टुरिजम कॉनक्लेव्ह २४ जानेवारी रोजी कलिना येथील ग्रॅण्ड हयात येथे आयोजित केले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे टुरिजम कॉनक्लेव्ह सुरू राहील. क्रिकेट क्लिनिक २६ ते २८ जानेवारी दरम्यान सकाळी ७ ते रात्री ९ आणि रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ठाकूर क्रिकेट मैदान (कांदिवली पूर्व) येथे आयोजित केले आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉनचे २१ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजन केले आहे. टर्बो स्टार्ट फॉरएव्हर प्लॅनेट चॅलेंज २५ जानेवारी रोजी बीएसई फोर्ट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजता आयोजित केले आहे. पॅरामोटर शो २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गिरगाव चौपाटी येथे आयोजित केला आहे. म्युझिक फेस्ट १९ ते २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विविध ठिकाणी आयोजित केले आहे. संगीत महोत्सवाचे महालक्ष्मी रेसकोर्स येथे २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी आयोजन केले आहे. समारोप कार्यक्रम २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता वांद्रे येथील एमएमआरडीए मैदान येथे आयोजित केला आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी  https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

Web Title: 'Mumbai Festival' will be held from tomorrow; Organized various programs, inaugurated by CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.