मुंबई – कोरोनाच्या संसर्गाचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईत या विषाणूचा विळखा कमी होत असल्याचे दिसून आले आहे. मागील तीन महिन्यांत मुंबईकरांसाठी सकारात्मक बाब म्हणजे, संसर्गाच्या वाढत्या काळात पहिल्यांदाच कोविड वाढीचा एकूण दर दीड टक्क्यांहून कमी झाला आहे. २ ते ८ जुलैपर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर १.४९ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर ५० टक्क्यांजवळ आला असून तो ४७ दिवसांवर गेला आहे.
मुंबईत गुरुवारी १ हजार २६८ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली. शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या ८९ हजार १२४ झाली आहे. तर बळींचा आकडा ५ हजार १३२ झाला आहे. अन्य कारणांमुळे आतापर्यंत १२ मृत्यू झाले आहेत. मुंबईत दिवसभरात ५१३ रुग्ण तर आतापर्यंत एकूण ६० हजार १९५ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. विविध रुग्णालयांत २३ हजार ७८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ६८ मृत्यूंमध्ये २७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ३७ रुग्ण पुरु, व ३१ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ४३ जणांचे वय ६० हून अधिक होते. तर उर्वरित २२ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ६७ टक्के झाला आहे. बुधवारपर्यंत शहर उपनगरात ३ लाख ७४ हजार १४२ कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत.
मालाडमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण
मुंबईत २४ विभागांमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित मालाड (पी/एन) विभागात असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या विभागात कोरोना बाधितांची संख्या ५ हजार ३८२ असून २०८ मृत्यू झाले आहेत. तर सक्रिय रुग्ण या विभागात सर्वाधिक असून ही संख्या २ हजार १०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या विभागातील ३ हजार ७१ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
विभाग सक्रिय रुग्ण
मालाड – पी/एन २ हजार १०३
जोगेश्वरी-के/ई १ हजार ७१५
भांडुप-एस १ हजार ५७०
बोरीवली-आर/सी १ हजार ५३७
अंधेरी-के/डब्ल्यू १ हजार ४२७
मुलूंड-टी १ हजार ३९८
अन्य महत्वाच्या बातम्या...
सारथी! दोन तासात 8 कोटींचा निधी, हीच समाजाची ताकद; संभाजीराजेंची प्रतिक्रिया
मुंबईपेक्षा ठाणेच कोरोनामुळे अधिक बेजार; उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा मोठा
रेल्वेकडेही पैशांची वानवा? कंत्राटी कामगारांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले; जेवणाचेही हाल
महाराष्ट्रासमोर आव्हान! कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढायला लागली; दिवसभरात 219 बळी
मोठी बातमी! ICSE बोर्डाचे 10 वी, 12वीचे निकाल उद्या जाहीर होणार
कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट
भाजपच्या नरेंद्र मेहतांची नागरिकास अश्लिल, अर्वाच्च शिवीगाळ; हेल्पलाईनवर केलेली तक्रार
परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार