मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांचा होणार गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 12:23 AM2020-01-26T00:23:27+5:302020-01-26T00:23:38+5:30
अग्निशमन दलाची सेवा ही गणवेशधारी सेवा आहे.
मुंबई : उत्कृष्ट अग्निशमन सेवेसाठी मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त गौरविण्यात येणार आहे.
वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेली आग विझविताना ८९ जणांची सुखरूप सुटका केल्याबद्दल मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे संचालक प्रभात रहांगदळे, मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख अधिकारी राजेंद्र चौधरी, विभागीय अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी मिलिंद दोंदे, केंद्र अधिकारी अभिजित सावंत, यंत्रचालक सुधीर वर्तक, डेप्युटी चीफ फायर आॅफिसर दिलीप पालव यांना ‘अग्निशमन सेवा शौर्य पदका’ने गौरविण्यात येणार आहे.
याचप्रमाणे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी कैलास हिवराळे, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी विजयकुमार पाणिग्रही, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यशवंत जाधव यांना ‘अग्निशमन सेवा पदका’ने गौरविण्यात येणार आहे.
गणवेशधारी सेवा
अग्निशमन दलाची सेवा ही गणवेशधारी सेवा आहे. कर्तव्य बजावताना शिस्त, व्यावसायिक कुशलता, शौर्य महत्त्वाचे असते. जे अधिकारी, कर्मचारी ही सेवा दीर्घकाळ बजावतात त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल त्यांना गौरविण्यात येते.