अंधेरीत अग्नितांडव, अग्निशमन अधिकारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 02:10 PM2018-09-11T14:10:50+5:302018-09-11T14:21:34+5:30
अंधेरी पूर्वेकडील मधू इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये इमारतीत अग्नितांडव सुरू आहे. आगीनं रौद्ररुप धारण केले असून अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.
मुंबई - अंधेरी पूर्वेकडील मधू इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये इमारतीत अग्नितांडव सुरू आहे. आगीनं रौद्ररुप धारण केले असून अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे अधिकारी योगेश शेलार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागण्यामागील नेमकं कारण अद्यापर्यंत स्पष्ट झालेले नाही.
मंगळवारी (11 सप्टेंबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मधू इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका इमारतीमध्ये भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब आणि चार पाण्याचे टँकर्स तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 4 तासांनंतरहीअद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेले नाही. आगीची तीव्रता वाढल्याने 15 गाड्या घटनास्थळी आहेत. या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
#Mumbai: Fire broke out in a building, in Madhu Industrial Estate, Andheri East at 10 am today; 4 fire engines and 4 water tankers present at the spot, no casualties reported pic.twitter.com/uXNkARSWXe
— ANI (@ANI) September 11, 2018