कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून सेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 06:57 AM2018-01-08T06:57:02+5:302018-01-08T15:29:44+5:30

शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत हत्येचा 24 तासांच्या आत छडा लावण्यात पोलिसांना यश, कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून सावंत यांची हत्या, एकाला अटक, चौघांचा शोध सुरु

Mumbai: Former Shiv Sena corporator Ashok Sawan murdered | कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून सेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या, एकाला अटक

कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून सेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या, एकाला अटक

Next

मुंबई: शिवसेनेचे मागठाणे विधानसभाप्रमुख, माजी नगरसेवक अशोक सावंत यांची कांदिवली (पूर्व) येथे निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना बाईकस्वारांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सावंत यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सावंत यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या आतमध्ये छडा लावला आहे.  कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून सावंत यांची हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. एकजणला अटक करण्यात आली आहे. तर चौघाचां अद्याप शोध सुरु आहे. 

सावंत यांना गेल्या काही दिवसापासून खंडणीसाठी धमक्या येत असल्याचं कळतंय. या खंडणीसाठीच त्यांची हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. दहशतवाद विरोधी पथकातील एसीपी सुभाष सावंत हे त्यांचे भाऊ आहे.

अशोक सावंत रात्री घरी परतत असताना त्यांच्या समता नगर इथल्या इमारतीबाहेर दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. सावंत यांना रूग्णालयामध्ये नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्हीमध्ये सावंत यांचे मारेकरी कैद झाले असून यातील एका आरोपीची ओळख पटली आहे. जग्गा असं या आरोपीचं नाव असून तो कुख्यात गुंड असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सावंत यांना खंडणीसाठी धमकावण्यात येत होतं, त्यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दाखलही केली होती. सावंत हे दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 

Web Title: Mumbai: Former Shiv Sena corporator Ashok Sawan murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.