Join us

कुर्ला स्थानकाजवळ भिंत कोसळली, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 11:43 IST

मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.

मुंबई - मुंबईतील मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानक परिसरात भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र चार जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (7 सप्टेंबर) सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळील रेल्वे कंपाऊंडची भिंत कोसळली आहे. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. 

जखमींची नावे 

1. सिराज (वय 30 वर्ष)

2. लाखन खातल ( वय 29 वर्ष)

3. लक्ष्मण पाटील (वय 40 वर्ष)

4. आमिर कासिन (वय 58 वर्ष )

जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :मध्य रेल्वेअपघात