मुंबई: चड्डी-बनियन गँगच्या ४ दरोडेखोरांना अटक

By admin | Published: February 8, 2016 09:13 AM2016-02-08T09:13:14+5:302016-02-08T12:31:01+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत चोरी करत, दरोडे टाकून धुमाकूळ घालणा-या चड्डी-बनियन गँगच्या ४ दरोडेखोरांना बोरिवली पोलिसांना अटक केली.

Mumbai: Four Thieves of Chandni-Biani Gang Detained | मुंबई: चड्डी-बनियन गँगच्या ४ दरोडेखोरांना अटक

मुंबई: चड्डी-बनियन गँगच्या ४ दरोडेखोरांना अटक

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत चोरी करत, दरोडे टाकून धुमाकूळ घालणा-या चड्डी-बनियन गँगच्या  ४ दरोडेखोरांना अटक करण्यात बोरिवली पोलिसांना अखेर यश आले. बोरिवली पश्चिमेकडे पोलिसांनी काल रात्री धडाकेबाज कारवाई करत ४ जणांन अटक केली तर इतर तिघे जंगलात पसार झाले.
 
काल रात्री चड्डी-बनियन गँगने बोरिवली पश्चिमेकडील सत्यकृपा सोसायटीत एका वृद्धाच्या घरी दरोडा टाकला. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली. ही चोरी पाहणा-या एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली मात्र दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. घटनेची माहिती कळताच पोलिस तेथे तत्काळ दाखल झाले आणि त्यांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी गोळीबारही केला. त्यांनी ४ जणांना जेरबंद केले खरे पण तीन जण मात्र लगतच्याच जंगलात पसार झाले. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत असून दरोडेखोरांच्या दगडफेकीत एक पोलिस जखमी झाला आहे.
 

Web Title: Mumbai: Four Thieves of Chandni-Biani Gang Detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.