कचराकोंडी फुटेना! डम्पिंग ग्राऊंडची क्षमता आता संपण्याच्या मार्गावर, विल्हेवाट लावायची कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:35 IST2025-01-27T13:34:16+5:302025-01-27T13:35:54+5:30

पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडची क्षमताही आता संपण्याच्या मार्गावर आहे.

mumbai garbage problem is not over The capacity of the dumping ground is now running out | कचराकोंडी फुटेना! डम्पिंग ग्राऊंडची क्षमता आता संपण्याच्या मार्गावर, विल्हेवाट लावायची कशी?

कचराकोंडी फुटेना! डम्पिंग ग्राऊंडची क्षमता आता संपण्याच्या मार्गावर, विल्हेवाट लावायची कशी?

मुंबई

मुंबईत दररोज सुमारे सहा हजार ५०० मेट्रिक टन कचरा तयार होत असून त्याच्या विल्हेवाटासाठी महापालिकेने आतापर्यंत अनेक उपाययोजना, प्रकल्प, मोहिमा राबवल्या. मात्र, तरीही कचऱ्याची समस्या कायम आहे. पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडची क्षमताही आता संपण्याच्या मार्गावर आहे. डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध प्रकल्पांसह उपाययोजना केल्या आहेत. 

पालिकेने कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी अद्याप ठोस यंत्रणा उभी केलेली नाही. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट नियोजनबद्ध पद्धतीने करुन घनकचरा शून्यावर आणण्याकरिता दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने आता कचऱ्याचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले आहे. तसेच विविध प्रकल्प आणि कचऱ्यातून वीजनिर्मितीसारख्या उपाययोजना केल्या आहेत. दुसरीकडे नागरिकांनीही ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे, असे आवाहन पालिकेने केले आहे. 

७२ टक्के ओला कचरा 
दररोज निर्माण होणाऱ्या ओला कचऱ्यात टाकाऊ अन्नपदार्थ, तर उर्वरित कचऱ्याच लाकूड, कापड, वाळू, दगड, मातीस कागद, प्लास्टिक असते. 

विल्हेवाटीसाठी प्रकल्प
दहिसर आणि कल्याण-शीळ फाटा येथे राडोराडा आणि घरांच्या नूतनीकरणातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. महालक्ष्मी रिफ्युज ट्रान्सफर स्टेशन, कुर्ला रिफ्युज ट्रान्सफर स्टेशन, वर्सोवा येथे ट्रान्सफर स्टेशन आणि गोराई रिफ्युज ट्रान्सफर स्टेशन तयार कऱण्यात आले आहेत. 

देवनार, मुलुंड आणि कांजूर येथे डम्पिंग ग्राऊंड आहेत. महापालिकेच्या केईएम, सायन, कस्तुरबा व शिवडी येथील टीबी रुग्णालयात भूमिगत कचरापेट्या बसवल्या आहेत. 

कचरामुक्त मोहीम
१. पालिकेने कचरामुक्त तास मोहीम हाती घेतली असून त्याच्या पहिल्याच दिवशी ६४ मेट्रिक टन कचरा संकलन करत त्याची विल्हेवाट लावली. सुमारे एक हजार ४३९ कामगार, कर्मचाऱ्यांनी १५३ संयंत्रांच्या सहाय्याने ही कामगिरी केली. या मोहिमेअंतर्गत अडगळीत साचलेला व दुर्लक्षित कचरा, बांधकाम राडारोडा प्राधान्याने संकलित करण्यात येत आहे. 

२. चाळी, झोपडपट्ट्या, अशा दाटवस्तीच्या भागांतील अंतर्गत रस्ते व गल्लीबोळ स्वच्छ ठेवले जातील. बेवारस वाहनांवर कारवाई केली जाईल. निवडलेल्या भागांतील सार्वजनिक स्वच्छतागृहे पूर्णत: स्वच्छ केली जातील, असे आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.

Web Title: mumbai garbage problem is not over The capacity of the dumping ground is now running out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.