मुंबई- गाेरखपूर ग्रीष्मकालीन अतिरिक्त गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:05 AM2021-04-26T04:05:02+5:302021-04-26T04:05:02+5:30

हावडा, गुवाहाटी जाणाऱ्या प्रवाशांसाठीही सुविधा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उन्हाळ्यासाठी ...

Mumbai-Garekhpur summer extra trains | मुंबई- गाेरखपूर ग्रीष्मकालीन अतिरिक्त गाड्या

मुंबई- गाेरखपूर ग्रीष्मकालीन अतिरिक्त गाड्या

Next

हावडा, गुवाहाटी जाणाऱ्या प्रवाशांसाठीही सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उन्हाळ्यासाठी अतिरिक्त आरक्षित विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई- गाेरखपूर, तसेच मुंबई- हावडा / गुवाहाटीसाठीही ग्रीष्मकालीन अतिरिक्त गाड्या चालवण्यात येतील. आरक्षित तिकीट असणाऱ्यांनाच या गाडीतून प्रवास करता येईल, तसेच प्रवासादरम्यान कोरोनासंबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)- गोरखपूर विशेषगाडी सीएसएमटीहून २९ एप्रिल रोजी १७.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूरला येथे तिसऱ्या दिवशी ५.०५ वाजता पोहोचेल. विशेषगाडी गोरखपूर येथून १ मे रोजी ९.४५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी २३ वाजता पोहोचेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)- हावडा विशेष एकमार्गी (वन वे) गाडी एलटीटीहून २८ एप्रिल रोजी २२ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी हावडा ११.३५ वाजता पोहोचेल, तर मुंबई- गुवाहाटी विशेष एकमार्गी (वन वे) गाडी सीएसएमटीहून २८ एप्रिल रोजी २३.४५ वाजता सुटेल आणि गुवाहाटी येथे चौथ्या दिवशी १.२० वाजता पोहोचेल.

Web Title: Mumbai-Garekhpur summer extra trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.