Mumbai: गौरी-गणपतीला रंगीबेरंगी फुलांचा साज!
By सचिन लुंगसे | Published: September 11, 2023 01:01 PM2023-09-11T13:01:34+5:302023-09-11T13:03:10+5:30
Mumbai: गौरी-गणपतीच्या सणाला मुंबापुरी सजू लागली असून, चौफेर फुलांची उधळण करण्यासाठी दादरचे फुल मार्केटही बहरले आहे. राज्यासह देशभरातून दादरच्या फुल मार्केटमध्ये ट्रक आणि टेम्पोमधून दाखल होणाऱ्या फुलांची आवक वाढत असतानाच रंगीबेरंगी फुलांची खरेदी करण्यासाठी दादर परिसर फुल्ल झाला आहे.
- सचिन लुंगसे
(वरिष्ठ प्रतिनिधी)
गौरी-गणपतीच्या सणाला मुंबापुरी सजू लागली असून, चौफेर फुलांची उधळण करण्यासाठी दादरचे फुल मार्केटही बहरले आहे. राज्यासह देशभरातून दादरच्या फुल मार्केटमध्ये ट्रक आणि टेम्पोमधून दाखल होणाऱ्या फुलांची आवक वाढत असतानाच रंगीबेरंगी फुलांची खरेदी करण्यासाठी दादर परिसर फुल्ल झाला आहे. शनिवारसह रविवारी दादरच्या फुलमार्केटमध्ये मुंगी शिरायलासुद्धा जागा राहात नाही, अशी अवस्था असून, या मार्केटमध्ये दिवसाला १० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होत असावी, असा अंदाज फुल विक्रेत्यांनी बांधला आहे.
राज्यातून कुठून माल येतो?
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, कणकवली, दापोली, खेड येथून फुलांचा माल दादरच्या मार्केटमध्ये येतो.
वसई येथून मोगरा आणि चाफा या फुलांची आवक होते.
भगवा गोंडा
सुका १२० ते २०० रुपये प्रतिकिलो
गणपतीपर्यंत ओला गोंडा १५० प्रति रुपये
पिवळा गोंडा
सुका १५० ते २०० रुपये प्रतिकिलो
गणपतीपर्यंत ओला गोंडा १५० प्रति रुपये
शेवंती
सुकी २५० ते ३०० रुपये / जुडी
गणपतीपर्यंत ओली १५० रुपये / जुडी
देशभरातून कुठून माल येतो?
उटी, बंगळुरू, हैदराबाद, हिमाचल प्रदेश, लखनऊ येथून माल येतो.
मीनाताई ठाकरे मंडई ६०० दुकाने आहेत. रस्त्यावर ४०० विक्रेते बसतात.
दादरच्या जुन्या फुलबाजारात ३० ते ४० दुकाने आहेत. रस्त्यावर ७०० विक्रेते बसतात.
चाफा ४०० ते ५०० रुपये - १०० फुले
चमेली, सायली १ हजार रुपये प्रतिकिलो
अबोली १ हजार रुपये प्रतिकिलो
गौरी-गणपती असो किंवा दसरा; या सणांमध्ये दादरच्या फुल मार्केटमध्ये फुलांची मोठी आवक होते. मालाची आवक कशी होते? यावर किमती ठरतात. सरासरी दिवसाला १० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल होत असून, या गर्दीमध्ये उत्तरोत्तर भर पडेल.
- सदानंद मंडलिक, व्यापारी
आता उत्सवांमुळे सोमवार ते शुक्रवारीही गर्दीचा महापूर असतो. गणेशोत्सवाची लगबग सुरू झाल्याने खरेदी विक्रीचा उत्साह वाढला आहे. पुढच्या आठवड्यात उलाढालही वाढेल.
- गणेश मोकल, व्यापारी