Special commissioner of police, Mumbai: "आता महाराष्ट्रासाठी विशेष राज्यपालाचेही नवीन पद निर्माण करा"; शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 08:59 PM2023-01-04T20:59:48+5:302023-01-04T21:04:45+5:30

आज सरकारने मुंबईसाठी विशेष पोलीस आयुक्तांची नियुक्ती केली

Mumbai gets special commissioner of police NCP slams Eknath Shinde Devendra Fadnavis over this | Special commissioner of police, Mumbai: "आता महाराष्ट्रासाठी विशेष राज्यपालाचेही नवीन पद निर्माण करा"; शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला

Special commissioner of police, Mumbai: "आता महाराष्ट्रासाठी विशेष राज्यपालाचेही नवीन पद निर्माण करा"; शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला

googlenewsNext

special commissioner of Mumbai police: मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई आणि उपनगरांत दररोज लाखो-करोडोंची उलढाल होत असते. अशा परिस्थितीत या शहरात गुन्हेगारीचे प्रमाणही अधिक असून त्याला आळा घालण्यासाठी आज एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारने मुंबईला विशेष पोलीस आयुक्त देण्याचा निर्णय घेतला. देवेन भारती यांची मुंबईचे नवे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांनी राज्य सुरक्षा महामंडळ, एटीएस प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही या विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र राज्य सरकारला खोचक टोला लगावला आहे.

सरकारने आता महाराष्ट्राच्या विशेष राज्यपालाचेही नवीन पद निर्माण करावे अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. आज सरकारकडून मुंबईत विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती करण्यात आली त्यावर महेश तपासे यांनी आपले मत व्यक्त केले. जसे विशेष पोलीस आयुक्त पद निर्माण करण्याचा निर्णय शिंदे - फडणवीस सरकारने घेतला, तसे सरकारसाठी विशेष मुख्य सचिव आणि मुंबईसाठी विशेष महापालिका आयुक्तपदही निर्माण करणार का? असा प्रश्नही महेश तपासे यांनी विचारला. याशिवाय, महेश तपासे यांनी विशेष आयुक्तांच्या या नवीन पदाच्या निर्मितीमागील गृहखात्याच्या तर्कशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, प्रशासकीय निकड म्हणून पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखाला पोलीस आयुक्तांच्या कामावर अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण करण्यासाठी, “अपर पोलीस महासंचालक” दर्जाच्या पदाची आवश्यकता विचारात घेऊन, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्या. यांच्या आस्थापनेवरील “संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी” हे “अपर पोलीस महासंचालक” दर्जाचे पद, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या पदाचे नामाभिधान “विशेष पोलीस आयुक्त” असे करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, हे पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखाली सर्व पोलीस सह आयुक्तांच्या कामाचे संनियंत्रण व पर्यवेक्षण करतील, अशी माहिती आहे.

Web Title: Mumbai gets special commissioner of police NCP slams Eknath Shinde Devendra Fadnavis over this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.