शिवजयंतीदिवशी हडसर किल्ल्यावरून पडून मुंबईच्या तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 17:08 IST2020-02-19T17:04:39+5:302020-02-19T17:08:44+5:30
ही तरुणी मुंबईची रहिवासी असून ती मित्रांसोबत शिवजयंती साजरी करण्यासाठी हडसर किल्ल्यावर केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

शिवजयंतीदिवशी हडसर किल्ल्यावरून पडून मुंबईच्या तरुणीचा मृत्यू
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी केली जात असताना जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावरुन पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी मुंबईची रहिवासी असून ती मित्रांसोबत शिवजयंती साजरी करण्यासाठी हडसर किल्ल्यावर केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सिद्धी कामठे (२०) असं मृत तरुणीचं नाव आहे.
पुणे - हडसर किल्ल्यावरुन पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, तरुणी मुंबईतील रहिवाशी असल्याची माहिती https://t.co/CbvSFUB0GJ
— Lokmat (@MiLOKMAT) February 19, 2020
मुंबईतील ग्रुप शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नरजवळील हडसर किल्ल्यावर गेला होता. या ग्रुपमधील एका तरुणीचा किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणीच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.