मुंबईकरांना पालिकेचा ‘सोशल’ दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:15 AM2019-12-31T01:15:44+5:302019-12-31T01:15:54+5:30

नागरी समस्यांचा झटपट निपटारा

Mumbai gives 'social' comfort to the municipality | मुंबईकरांना पालिकेचा ‘सोशल’ दिलासा

मुंबईकरांना पालिकेचा ‘सोशल’ दिलासा

Next

- शेफाली परब - पंडित 

मुंबई : ‘सरकारी काम, सहा महिने थांब,’ असा अनुभव आतापर्यंत अनेकांना आला असेल, पण हायटेक युगात ही म्हण बदलण्याचा महापालिका प्रशासनाने निर्धार केला आहे. यासाठी सामाजिक माध्यमातून नागरी तक्रारींची नोंद ठेवली जात असल्याने, कामचुकार अधिकाऱ्यांची तारांबळ उडू लागली आहे. नागरी समस्यांचा निपटारा तत्काळ होऊ लागला आहे.

आपत्ती काळात सतर्क करणे, पावसाळ्यात हवामानाचे अंदाज आणि वाहतुकीत बदल अशा महत्त्वपूर्ण सूचना मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी पालिकेने २०१३ पासून सामाजिक माध्यमांचा आधार घेण्यास सुरुवात केली. फेसबुकच्या माध्यमातून पावसाचे अंदाज
व त्या अनुषंगाने कोणती काळजी घ्यावी, याबाबत संदेश देण्यात येत होते. त्यातूनच @DisasterMgmtBMC या टिष्ट्वटर हँडलचा जन्म झाला. जून, २०१९ मध्ये याचे नामकरण @mybmc करून महापालिकेने सर्वच नागरी तक्रारींकरिता मुंबईकरांसाठी नवे व्यासपीठ खुले केले.

नागरी सेवा व समस्यांशी मुंबईकरांचा दररोजच सामना होत असतो. त्यामुळे १९१६ अशा हेल्पलाइनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे नियमित तक्रारी घेण्यात येतात. सहा महिन्यांच्या कालावधीत टिष्ट्वटरच्या माध्यमातून सुमारे दीड लाख फॉलोअर्स महापालिकेशी जोडले
गेले आहेत. दर आठवड्याला या तक्रारींचा आढावा वरिष्ठ अधिकारी घेत असल्याने समस्यांचा निपटारा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. पुढच्या टप्प्यात महापालिका इन्स्टाग्रामवरही आपले खाते उघडणार आहे.

अशी घेतली जाते तक्रारींची दखल...
सोशल मीडियावर येणाºया तक्रारींची दखल घेण्यासाठी ३२ कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत असते. सर्व २४ विभाग कार्यालयांना या टिष्ट्वटर हँडलशी जोडण्यात आले आहे.
टिष्ट्वटरवरील नागरी तक्रारींची नोंद करून या पथकातील कर्मचारी संबंधित अधिकाºयाला सूचित करतात.
त्या अधिकाºयाला तत्काळ तक्रारीची दखल घेऊन त्यावर कोणती कार्यवाही केली, याचा अहवाल द्यावा लागतो.
तक्रार करतेवेळी असलेली नागरी समस्येची स्थिती आणि काम केल्यानंतरचे चित्र. उदा. खड्डे असलेला रस्ता आणि खड्डा बुजविल्यानंतरचे चित्र टिष्ट्वटरवर अपडेट करावे लागते.

सोशल मीडियाचा असाही फायदा...
नागरी समस्या घेऊन पालिकेच्या विभाग कार्यालयात जाणाºया नागरिकांना वारंवार खेटे घालावे लागत, तरी प्रश्न महिनोंमहिने सुटत नव्हते. मात्र, सोशल मीडियाचा कारभार पारदर्शक असल्याने, वरिष्ठांकडून कारवाईच्या भीतीने तक्रारींची झटपट दखल घेतली जात आहे, तसेच नेहमी टीकेचा सामना करणाºया महापालिकेला आपली छबी सुधारण्यास संधी मिळत आहे. त्याचप्रमाणे, नागरिकांनी केलेल्या सूचनांचा अभ्यास करता येतो.

दर शनिवारी बनते रिपोर्ट कार्ड...
टिष्ट्वटरवर येणाºया प्रत्येक तक्रारींचा अहवाल तयार होत असतो. दर शनिवारी त्या आठवड्यात आलेल्या तक्रारींचा अहवाल तयार केला जातो. हा अहवाल संबंधित खात्याचे अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यांच्याकडे पाठविला जातो. एवढेच नव्हे, तर काही तक्रारदारांना फोन करून पालिकेने केलेल्या कामाबद्दल ते समाधानी आहेत का? याची खातरजमा केली जाते. त्यामुळे अधिकाºयांना आपली जबाबदारी ढकलता येत नाही.

सोशल मीडियाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते. सामाजिक संदेश, उपक्रमांची माहितीही देणे शक्य झाले आहे. आजच्या काळात मुंबईकरांशी जोडणारे हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे या टिष्ट्वटर हँडलला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. नागरिकांच्या तक्रारी, सूचनांची दखल त्वरित घेतली जात आहे.
- महेश नार्वेकर (संचालक, महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष).

Web Title: Mumbai gives 'social' comfort to the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.