Join us

मुंबई ते गोवा क्रुझ सेवेस बुधवारपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 7:02 AM

दोन हजार प्रवासी क्षमता : मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल येथे जहाजाचे होणार नामकरण

मुंबई : मुंबई ते गोवा जलमार्गे प्रीमियम सेवा पुरविणाऱ्या क्रुझ सेवेला बुधवार, १७ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. मुंबई - गोवा - मुंबई या ३ दिवस २ रात्रींच्या प्रवासासाठी किमान भाडे १८ हजार रुपयांपासून आहे. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीदेखील याचा लाभ घेऊ शकतील, असा दावा करण्यात आला.१४ मजली इमारतीएवढ्या भव्य असलेल्या या क्रुझचे वजन ७० हजार २८५ टन असून त्यामधून एकावेळी २ हजार प्रवासी प्रवास करू शकतील. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची या क्रुझची क्षमता आहे. भारतीय आदरातिथ्य देणारे सुमारे ६०० कर्मचारी या क्रुझवर सेवा देतील.हजारो वर्षांपासून सुरू असलेली जहाजाचे नामकरण करण्याची पद्धत यानिमित्ताने पुन्हा अंमलात आणण्यात येणार असून, १९ एप्रिलला मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल येथे होणाºया कार्यक्रमात या जहाजाचे नामकरण करण्यात येणार आहे.एप्रिल ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबई-गोवा-मुंबई दरम्यान या क्रुझ सेवेच्या १५ फेºया होतील. त्यानंतर ३१ मे रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ती सज्ज होईल. सप्टेंबरपर्यंत क्रुझ तिथून प्रवास करेल. नंतर पुन्हा मुंबईकडे रवाना होईल. प्रवासादरम्यान विविध खाद्यपदार्थ, मनोरंजन, मन:शांतीसाठी विविध पर्याय उपलब्ध असतील. क्रुझवरील खाद्यपदार्थांमध्ये मांसाहारी पदार्थांचा जास्त भरणा असतो. मात्र, या क्रुझमध्ये शाकाहारी व विशेषत: जैन खाद्यपदार्थांचादेखील समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रम व विशेष सुविधा पुरवण्यात येतील.असे असेल नियोजनमुंबईतून सायंकाळी ५ वाजता ही क्रुझ निघेल व दुसºया दिवशी सकाळी ८ वाजता गोव्याला पोहोचेल असे नियोजन आहे. गोवा येथून दुपारी ३ वाजता ही क्रुझ निघेल व दुसºया दिवशी सकाळी ७ वाजता मुंबईत पोहोचेल.