मुंबई-गोवा महामार्ग पाली ते लांजा रात्रभर बंद राहणार; एलपीजी टँकर नदीत कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 07:53 PM2022-09-22T19:53:57+5:302022-09-22T20:39:03+5:30

कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने काँप्रेस्ड एलपीजी घेऊन जात होता. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलादरम्यान हा कंटेनर आला असता अपघातग्रस्त झाला.

Mumbai-Goa highway will remain closed overnight, optional road open fro traffic; 28 kl LPG tanker fell into the river near Lanja, Ratnagiri | मुंबई-गोवा महामार्ग पाली ते लांजा रात्रभर बंद राहणार; एलपीजी टँकर नदीत कोसळला

मुंबई-गोवा महामार्ग पाली ते लांजा रात्रभर बंद राहणार; एलपीजी टँकर नदीत कोसळला

Next

मुंबई - गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरून एलपीजीची वाहतूक करणारा टँकर नदीत कोसळला आहे. यामुळे टँकमधून एलपीजी गॅसची गळती सुरु असून सावधानता म्हणून आज रात्रभर मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. 

एलपीजी टँकरची गळती तात्पुरत्या स्वरुपात रोखण्यात आली आहे. उरण आणि गोव्यावरून दोन टीम अपघात स्थळी पोहोचणार आहेत. आज दुपारी तीन वाजता हा अपघात झाला आहे. पुलाचा कठडा तोडून टँकर पाण्यात कोसळला आहे. या टँकरमध्ये २८००० किलो एवढा प्रचंड एलपीजी गॅस भरलेला आहे. 

हा कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने काँप्रेस्ड एलपीजी घेऊन जात होता. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलादरम्यान हा कंटेनर आला असता अपघातग्रस्त झाला. मुंबई गोवा महामार्गावरील या भागातून जाणार टप्पा बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग पालीतून दाभोळेमार्गे लांजा असा असणार आहे.

Web Title: Mumbai-Goa highway will remain closed overnight, optional road open fro traffic; 28 kl LPG tanker fell into the river near Lanja, Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.