Mumbai: मोबाइलवर काढा हयातीचा दाखला, पीएफ कार्यालयात जाणे टळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 02:49 PM2023-04-19T14:49:11+5:302023-04-19T14:49:42+5:30

Mumbai News: आता घरबसल्या मोबाइल ॲपवरून हयातीचा दाखला मिळणार आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना हयातीच्या दाखल्यासाठी पीएफ कार्यालयाकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

Mumbai: got life certificate on mobile, avoid going to PF office | Mumbai: मोबाइलवर काढा हयातीचा दाखला, पीएफ कार्यालयात जाणे टळणार

Mumbai: मोबाइलवर काढा हयातीचा दाखला, पीएफ कार्यालयात जाणे टळणार

googlenewsNext

मुंबई : आयुष्यभर कष्ट करून निवृत्त झाल्यानंतर पेन्शनही विनासायास मिळेल/ मिळावी अशी कामगारांची अपेक्षा असते. मात्र पेन्शन मिळविण्यासाठी, हयातीच्या दाखल्यासाठी कामगारांना शंभर गोष्टींसाठी शंभर चकरा माराव्या लागतात. त्यातही शंभर अडचणी येतात. मात्र, आता अशा अडचणी येणार नाहीत. कारण घरबसल्या मोबाइल ॲपवरून हयातीचा दाखला मिळणार आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना हयातीच्या दाखल्यासाठी पीएफ कार्यालयाकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

ॲप असे करा डाऊनलोड
१) आधार फेस रिडर ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा (हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर सेटिंग्ज ॲप माहितीमध्ये दिसेल.)
२) जीवन प्रमाण फेस ॲप्लिकेशनला डाऊनलोड करा.
३) फाइल डाउनलोडवरून ॲप इस्टॉल करा आणि आवश्यक परवानग्या द्या.
४) ऑपरेटर ऑथेन्टिकेशन प्रक्रिया करा आणि ऑपरेटेरचा चेहरा स्कॅन करा (ही एकवेळची प्रक्रिया आहे. पेन्शनधारकदेखील ऑपरेट असू शकतात.).
५) मोबाइल पेन्शन प्रमाणीकरण आणि डीएलसी निर्मितीसाठी सज्ज
६) पेन्शनर तपशील भरा
७) पेन्शनरचे छायाचित्र स्कॅन करा (ब्लिंक न करता आणि कोणत्याही अभिव्यक्तीशिवाय योग्य प्रकाशात समोरच पोज द्या).
८) सबमिट - पेन्शनधारकाला प्रमाणीकरणाच्या वेळी प्रदान केलेल्या मोबाइलवर जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची लिंक असलेला संदेश प्राप्त होईल.

फायदे
     कोणताही स्मार्टफोन वापरा
     बाह्य उपकरणांची आवश्यकता नाही
     बँकेला भेट देण्याची गरज नाही
     जर बायोमेट्रिक तुमचे बोट ओळखत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही
आवश्यकता
     स्मार्टफोन (७.० किंवा वरील)
     इंटरनेट कनेक्शन
     पेन्शन भरणाऱ्या प्राधिकरणाकडे नोंदणीकृत आधार क्रमांक (बँक/पोस्ट ऑफिस इतर)
     मोबाइल कॅमेरा रिझोल्युशन - ५ एमपी किंवा अधिक

Web Title: Mumbai: got life certificate on mobile, avoid going to PF office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.