मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून, २ ते ८ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.२१ टक्के असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३६४ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या शहर उपनगरात ७ हजार ६७८ रुग्ण उपचाराधीन आहेत.
मुंबईत दिवसभरात ५९५ रुग्ण आणि ९ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९८ हजार २३३ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार १८० झाला आहे. आतापर्यंत २ लाख ७८ हजार ४९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहर, उपनगरात झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १८५ असून सक्रिय सीलबंद इमारती २ हजार ५१२ आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ३ हजार ३४७ सहवासितांचा शोध घेतला आहे.