Join us

काय सांगता? तब्बल 28 वर्षांनी मिळालं चोरीला गेलेलं मंगळसूत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 11:24 AM

रेल्वे स्टेशन आणि लोकलमध्ये चोरीच्या अनेक घटना या सातत्याने घडत असतात.

मुंबई - प्रवासादरम्यान अनेकदा काही वस्तू या चोरीला जातात. तर काही वेळा मंगळसूत्र आणि इतर दागिने घेऊन चोरटे पसार होतात. मात्र एकदा चोरीला गेलेली वस्तू परत मिळतेच असं नाही. पण लॉकडाऊनमध्ये एका महिलेला लॉटरी लागली आहे म्हणजेच तिचं चोरीला गेलेलं मंगळसूत्र तब्बल 28 वर्षांनी तिला परत मिळालं आहे. लोकलमधून प्रवास करताना महिलेचं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं. मात्र ते आता तिला अनेक वर्षांनी परत मिळालं आहे. 

रेल्वे स्टेशन आणि लोकलमध्ये चोरीच्या अनेक घटना या सातत्याने घडत असतात. रेल्वे स्टेशनवर कर्तव्य बजावणारे राज्य राखीव पोलिस (जीआरपी) मोबाईल चोरी तसेच स्टेशनवर घडणाऱ्या घटनांमध्ये व्यस्त असतात. प्रत्येक प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र लॉकडाऊनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत लोकलसेवा बंद आहे. यामुळे जीआरपी सध्या जुन्या प्रकरणांच्या फाईल्स बंद करण्यात व्यस्त आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शाह या महिलेचं लोकल प्रवासादरम्यान मंगळसूत्र चोरीला गेलं होतं. तब्बल 28 वर्षांपूर्वी म्हणजेच 3 डिसेंबर 1991 रोजी ही घटना घडली होती. चर्चगेटहून निघणाऱ्या लोकलच्या महिलांच्या डब्यातून मंजुळा शाह या प्रवास करत होत्या. त्याचदरम्यान गर्दीचा फायदा घेत कोणीतरी त्यांचं मंगळसूत्र चोरलं. मंजुळा यांनी मुंबई सेंट्रल जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. मात्र आपलं मंगळसूत्र परत मिळेल अशी आशा मंजुळा शाह यांनी सोडून दिली होती.

जीआरपीने 16 डिसेंबर, 1991 रोजी फातिमा नामक एका महिलेला चोरी प्रकरणी अटक केली होती. तिच्याकडून एक मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केलं होतं. 1991 मध्ये मोबाईल किंवा संपर्क करण्यासाठी काही साधन नव्हतं. तसेच मंजुळा शाह यांनी देखील फॉलोअप घेतला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी मंगलसूत्र आपल्याकडेच ठेवलं होतं. त्यानंतर जीआरपीने मंजुळा शाह यांचा पत्ता शोधून काढून त्यांना त्यांचं चोरीला गेलेलं मंगळसूत्र परत केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

माता न तू वैरिणी! पतीने माहेरी जाऊ दिलं नाही, पत्नीने 2 मुलींची केली हत्या

CoronaVirus News : धडकी भरवणारा ग्राफ! कोरोनाच्या आकडेवारीने नवा उच्चांक गाठला, अमेरिकेचाही रेकॉर्ड मोडला

सुशांतला मानाचा पुरस्कार; दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान

'निवडणुकीत माझा पराभव झाल्यास अमेरिकेवर चीनचा ताबा', ट्रम्प यांचं मोठं विधान

CoronaVirus News : भारताकडे कधी असणार कोरोना लस आणि किंमत किती?, रिसर्चमधून आली आनंदाची बातमी

टॅग्स :मुंबईचोरीगुन्हेगारी