मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:06 AM2021-05-16T04:06:49+5:302021-05-16T04:06:49+5:30
मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये कमालीची घट झाली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या ...
मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये कमालीची घट झाली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा फायदा होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ४४७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर २४ तासात ६२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली होती. परंतु, रुग्ण दरवाढ कमी झाल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईती रुग्ण बरे होण्याचा दर ९२ टक्के झाला आहे तर रुग्ण दुप्पटीचा दर २१३ दिवस झाला आहे. मुंबईत सक्रिय कन्टेनमेंट झोनची संख्या ८७वर गेली आहे तर सक्रिय सीलबंद इमारती ३७७ आहेत. मुंबईत गेल्या २४ तासात १,४४७ रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण ६ लाख ८७ हजार १५२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर ६२ कोरोनाबाधितांचा मृत्यू गेल्या २४ तासात झाला आहे. आतापर्यंत १४ हजार २०० कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबई क्षेत्रात दिवसभरात २४ हजार ८९६ चाचण्या करण्यात आल्या, तर आतापर्यंत एकूण ५८ लाख ७६ हजार १७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत.