Join us

मुंबईत विश्रांतीवर असलेल्या पावसाची आतापर्यंत ९९.६५ टक्के नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 5:51 PM

मुंबईत आता पावसाने विश्रांती घेतली आहे.

मुंबई : मुंबईत आता पावसाने विश्रांती घेतली आहे. गुरुवारी तर मुंबईत चक्क ऊनं पडले होते. आणि पावसाची नोंद कुलाबा, सांताक्रूझ वेधशाळेत ०.० मिमी एवढी झाली होती. मुंबई शहरात देखील १, पूर्व उपनगरात ०.० आणि पश्चिम उपनगरात ०.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईत आतापर्यंत झालेला एकूण सरासरी पाऊस २ हजार ४८० मिमी असून, ही टक्केवारी ९९.६५ एवढी आहे.

मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी पडझड सुरुच आहे. बुधवारी रात्री ऊशिरा साडे दहाच्या सुमारास मानखुर्द येथे सेक्टर जे मध्ये घराचे प्लास्टर कोसळले. यात चार जण जखमी झाले. त्यांना खासगी ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ३ जणांना किरकोळ मार लागल्याने उपचार करून सोडून देण्यात आले. एक मुलगा रुग्णालयात दाखल असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, ४ ठिकाणी बांधकाम कोसळले. ३ ठिकाणी झाडे पडली. ३ ठिकाणी शॉर्ट सर्किट घडले.

राज्यात विचार करता ४ सप्टेंबर रोजी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ५ आणि ६ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मुंबईचा विचार करता शुक्रवारसह शनिवारी शहर आणि उपनगरात रात्री आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.  

 

टॅग्स :पाऊसमुंबई मान्सून अपडेटहवामानमहाराष्ट्र