पावसानंतर मुंबई तापली; उष्णतेच्या लाटेचा इशारा

By सचिन लुंगसे | Published: May 14, 2024 07:49 PM2024-05-14T19:49:43+5:302024-05-14T19:50:30+5:30

मंगळवारी सकाळपासून मुंबईच्या हवामानात बदल झाले.

Mumbai heats up after rain Heat wave warning | पावसानंतर मुंबई तापली; उष्णतेच्या लाटेचा इशारा

पावसानंतर मुंबई तापली; उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई : वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले असतानाच आता दुसरीकडे हवामान खात्याने बुधवारसाठी मुंबई महानगर प्रदेशाला उष्णतेच्या लाटेचा इशार दिला आहे. तत्पूर्वी मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले असून, वाढत्या कमाल तापमानासह आर्द्रतेमुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा घाम फुटला आहे.

मंगळवारी सकाळपासून मुंबईच्या हवामानात बदल झाले. ढगाळ वातावरण निवळल्यानंतर थेट सुर्यप्रकाशामुळे मुंबईकरांना उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. वाढती आर्द्रतेमुळे मुंबईकरांना उकाडा असहय झाला. विशेषत: सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मुंबईकरांना ऊन आणि ऊकाड्याचा तडाखा बसत होता.
 
कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येईल. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्हयांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. - मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
 
१९ मे दरम्यान मान्सून बंगालच्या उपसागरात, इंडो्नेशियाच्या पश्चिम किनारपट्टी व सुमात्रा बेटापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानुसार देशाची पूर्व किनारपट्टी, कन्याकुमारी व आग्नेय अरबी समुद्रात पूर्वमोसमी गडगडाटी पाऊसपूरक वातावरण तयार होत आहे. - माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
 
कमाल तापमान / अंश सेल्सिअस
मुंबई ३६.८
ठाणे ३७
अलिबाग ३७
अहमदनगर ३६.८
छत्रपती संभाजी नगर ३८.३
बीड ४०.९
डहाणू ३६
जळगाव ४१.८
कोल्हापूर ३६.७
मालेगाव ४०.२
नांदेड ३८.६
नाशिक ३७.८
धाराशीव ३८.६
परभणी ३९.१
रत्नागिरी ३६.२
सांगली ३७.३
सातारा ३८.२
सोलापूर ३९.५

Web Title: Mumbai heats up after rain Heat wave warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई