Rains Live Updates : मुंबईत जोरदार पाऊस, तिन्ही मार्गांवरील लोकल खोळंबल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 06:16 AM2018-06-09T06:16:48+5:302018-06-09T15:58:24+5:30
मुंबईसह ठाणे उपनगरात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे.
मुंबई : मुंबईसह ठाणे उपनगरात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. मुंबईत सोसाट्याच्या वा-यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा मुंबईच्या लाईफलाईनवर परिणाम झाला असून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. शुक्रवारी(8 जून) रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे शनिवारी(9 जून) सकाळी मुंबईहून सुटलेली पहिली कसारा लोकल कुर्ल्या स्थानकात थांबवण्यात आली. त्यानंतरच्या खोपोलीपासून सर्व गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
मुंबईसह उपनगरात वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली या भागात मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. तर, ठाण्यातदेखील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ठाण्यातील रेल्वे स्थानकातील रुळ पाण्याखाली गेला आहे.
LIVE :
Streets water-logged in Mumbai's Andheri area after heavy rain lashed the city. Locals say, 'this has become a routine now. It is next to impossible to travel on the roads. No government has taken any action to solve this persistent problem.' #Maharashtra#MumbaiRainpic.twitter.com/dm8wQPv86S
The southwest monsoon reaches Mumbai on June 9, one day before the anticipated date of June 10. Heavy rainfall is expected till June 11: India Meteorological Department #Maharashtra
— ANI (@ANI) June 9, 2018
We are expecting heavy rainfall to continue over #Mumbai and Konkan region for the next two days. We have issued warnings of heavy rainfall to all agencies and fishermen: Ajay Kumar, India Meteorological Department #Maharashtra#MumbaiRainspic.twitter.com/1xWlm2hIiz
Streets water-logged in parts of Mumbai after heavy rain lashed the city. #Maharashtra#MumbaiRainspic.twitter.com/mZ2weZeugu
Rain lashes parts of Mumbai; #visuals from Marine Drive #Maharashtrapic.twitter.com/FMILbQUW8f
Heavy rain lashes #Mumbai leaving streets water-logged in several parts of the city. Visuals from Mahim area #Maharashtrapic.twitter.com/ter2ovY8M3
- तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक मंदावली आहे, प्रवासी हैराण झाले आहेत.
- 10.38 AM - दक्षिण मुंबईत पावसाला सुरुवात, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम. वाहतूक तब्बल 40 मिनिटे उशिरानं. अप-डाऊन दिशेच्या वाहतुकीवर परिणाम. प्रवाशांना मनस्ताप.
- मुंबईसह कोकणात 12 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
- दक्षिण मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची हजेरी. मुंबईकरांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
- मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक मंदावली
- पावसामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वेही अर्धा ते एक तास उशिराने
- भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचलं, 50 ते 60 घरांमध्ये पाणी शिरलं, भिवंडी शहरात विद्युत पुरवठा खंडित, विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू
Heavy rain lashes parts of #Maharashtra; pictures of water-logged streets in Thane's Kausa area. pic.twitter.com/Uik6LamXwc
— ANI (@ANI) June 8, 2018