विसर्जन मिरवणुकीत डीजेचा आवाज नाहीच, मुंबई हायकोर्टाकडून बंदी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 12:21 PM2018-09-21T12:21:11+5:302018-09-21T14:15:06+5:30
गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदी मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे.
मुंबई - गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदी मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. ध्वनीप्रदुषणाच्या मुद्द्यावरुन डीजे व डॉल्बीला परवानगी देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बीचा आवाज नसणार आहे.
'पाला' म्हणजेच प्रोफेशनल ऑडिओ अॅण्ड आणि लाइटनिंग असोसिएशनने याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने डीजे व डॉल्बीला परवानगी देण्यास नकार दिला आहे. चार आठवड्यांनी या प्रकरणावर हायकोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे.
Bombay High Court refuses to grant interim relief on plea filed by DJ and Dolby sound owners challenging ban imposed on them from being allowed to play in any processions including Ganapati Visarjan. Detailed hearing to take place in 4 weeks time. pic.twitter.com/uIvXiwJxNU
— ANI (@ANI) September 21, 2018
डीजे आणि इतर कर्णकर्कश आवाज करणारी वाद्ये वाजवणे सुरू करताच त्यांची किमान आवाज मर्यादा ही 100 डेसिबलपर्यंत असते. त्यामुळेच कमालीचे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या या वाद्यांना गणपती विसर्जनाच्या मिरवणुका व अन्य उत्सवांत परवागी दिली जाऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका याआधी राज्य सरकारच्यावतीने हायकोर्टात मांडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने डीजे व डॉल्बी मालकांना दिलासा देण्यास नकार देत डीजे व डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली आहे.