मुंबई तापली!

By Admin | Published: March 20, 2015 12:29 AM2015-03-20T00:29:16+5:302015-03-20T00:29:16+5:30

मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत असून, शहराचे कमाल तापमान ३५ अंशांवर पोहोचले आहे.

Mumbai is hot! | मुंबई तापली!

मुंबई तापली!

googlenewsNext

मुंबई : मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत असून, शहराचे कमाल तापमान ३५ अंशांवर पोहोचले आहे. तर किमान तापमानाने २२ अंशांपर्यंत मजल मारली आहे. परिणामी, मुंबईकरांना कमाल तापमानाचे चांगलेच चटके बसू लागले असून, रात्रीही उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यासह मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत अवकाळी पावसाने दणका दिला होता. परिणामी, वातावरणात झालेल्या बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात घट नोंदविण्यात येऊ लागली होती. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८, १८ अंशांवर घसरले होते. मात्र आता राज्याच्याही कमाल तापमानात वाढ झाली असून, राज्यातील प्रमुख शहरांच्या कमाल तापमानाने पस्तिशी ओलांडली आहे. शिवाय मुंबईलाही उन्हाच्या झळा बसू लागल्या असून, ३२ अंशांवर स्थिरावलेले कमाल तापमान ३५ अंशांवर पोहोचले आहे. दिवसा तापदायक ऊन आणि रात्री सोसाट्याचा वारा; अशा तापदायक हवामानाने मुंबईचे वातावरण ढवळून निघाले आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण-गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास
होते. (प्रतिनिधी)

मुंबईलाही उन्हाच्या झळा बसू लागल्या असून, ३२ अंशांवर स्थिरावलेले कमाल तापमान ३५ अंशांवर पोहोचले आहे. दिवसा तापदायक ऊन आणि रात्री सोसाट्याचा वारा; अशा तापदायक हवामानाने मुंबईचे वातावरण ढवळून निघाले आहे.

Web Title: Mumbai is hot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.