Join us

मुंबईतील घरांच्या किमतीत सुरू आहे दिवसेंदिवस घसरण; ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी विविध सवलती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 7:11 AM

जानेवारी ते जून या पहिल्या सहामाहीत मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात झालेल्या उलाढालीचा अहवाल नाईट फ्रॅक या जागतिक दर्जाच्या सल्लागार संस्थेने गुरुवारी प्रसिद्ध केला आहे.

मुंबई : गगनाला भिडणाऱ्या मुंबई शहरांतल्या घरांच्या किमतीत कोरोना संकटामुळे घसरण सुरू झाली आहे. विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील किमती अधिकृतरीत्या सरासरी तीन टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास येते. परंतु, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्टॅम ड्युटी माफ, जीएसटी सवलत आणि मोफत पार्किंग अशा विविध आॅफर्स विकासकांकडून दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात घरांच्या किमती ८ ते १८ टक्क्यांनी कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.जानेवारी ते जून या पहिल्या सहामाहीत मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात झालेल्या उलाढालीचा अहवाल नाईट फ्रॅक या जागतिक दर्जाच्या सल्लागार संस्थेने गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्राच्या अभूतपूर्व कोंडीचा आढावा घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी मुंबई महानगर क्षेत्रातील घरांचा सरासरी दर प्रती चौरस मीटर ७६ हजार ५९१ रुपये होता. त्यात ३.२ टक्के घट होत तो ७४ हजार १२२ रुपयांवर आला आहे. घरांच्या किमती कमी झाल्याचे विकासक अधिकृतरीत्या जाहीर करत नाहीत. मात्र, ग्राहकांबरोबर वैयक्तिक स्वरूपात होणाºया वाटाघाटींमध्ये घरांच्या किमतीमध्ये समाविष्ट असलेले जीएसटी आणि स्टॅम्प ड्युटीची रक्कम माफ करणे, पार्किंग विनामूल्य देणे, मोफत क्लब हाऊसचे सदस्यत्व, घरांचे पैसे टप्प्याटप्प्याने किंवा घरांचा ताबा घेताना देणे, घराच्या माध्यमातून भाडे स्वरूपात उत्पन्न मिळवून देणे, हप्त्यांमध्ये सूट अशा अनेक आॅफर्स दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात घरांची किंमत ८ ते १८ टक्क्यांनी कमी होत असल्याची माहिती नाइट फ्रॅक इंडियाच्या रिसर्च विभागाच्या चीफ इकॉनॉमिस्ट आणि नॅशनल डायरेक्टर रजनी सिन्हा यांनी दिली. विकासकाची आर्थिक परिस्थिती आणि प्रकल्पाची गती या आधारावर घरांच्या किमतीत कमी जास्त प्रमाणात सवलत दिली जात आहे.घरांच्या विक्रीत अभूतपूर्व घसरणगेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत ३३ हजार ७३१ घरांची विक्री झाली होती. यंदा ती ४५ टक्क्यांनी कमी होऊन १८,६४६ इतकी झाली आहे.कोरोनाचे संकट दाखल झाल्यानंतर एप्रिल ते जून या तिमाहीत तर फक्त २६८७ घरांची विक्री झाली असून, गेल्या वर्षी ते प्रमाण १५ हजार ९७४ इतके होते.यंदा नवीन घरांची पायाभरणी करण्याचे प्रमाणही ४३ हजार ८२२ वरून २३ हजार ४१९ इतके कमी झाले आहे. तर, नुकत्याच संपलेल्या तिमाहीत ती संख्या २१,६५५ वरून अवघी १०११ इतकी खालावली आहे.च्विक्री झालेल्या घरांपैकी ५४ टक्के घरे ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची होती हे विशेष.तर घरांच्या विक्रीला९ वर्षे लागतीलगेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत १ लाख ३६ हजार ५२४ घरे विक्रीच्या प्रतीक्षेत होती. ती संख्या आता१ लाख ५० हजार ७४ इतकी झाली आहे. सध्याच्या दरानेच जर या घरांची विक्री झाली तर अस्तित्वातील घरे विकण्यासाठी पुढील ९ वर्षे खर्ची पडतील, असे नाईट फ्रॅकचे मत आहे.सहा महिन्यांतील घरांची विक्री, त्यात झालेली घट आणि विक्रीच्या प्रतीक्षेतली घरेपरिसर विक्री घट प्रतीक्षेतीलमध्य मुंबई २६२ ५४ २३२१दक्षिण मुंबई १०१ ४५ ६४११पश्चिम मुंबई २४६२ ४९ २६२४५मध्य उपनगर १४९९ ४५ २९३२५मुंबई पलीकडची पश्चिम उपनगरे ५६४३ ४४ १९९२८मुंबई पलीकडची मध्य उपनगरे ३८२० ४६ १४६५२ठाणे २०५० ४० २४६७२नवी मुंबई २८०९ ४३ २६४६२

टॅग्स :मुंबई