मुंबई ‘आयआयटी’ ठरली क्यूएस रॅंकिंगमध्ये सर्वोत्तम; १४९ वरून ११८ स्थानावर घेतली झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 11:13 AM2024-06-06T11:13:37+5:302024-06-06T11:16:28+5:30

भारतातील ६१ टक्के विद्यापीठांचे क्यूएस क्रमवारीतील स्थान उंचावले आहे.

mumbai iit shine in qs world ranking jumped from 149 to 118 position among 150 universities | मुंबई ‘आयआयटी’ ठरली क्यूएस रॅंकिंगमध्ये सर्वोत्तम; १४९ वरून ११८ स्थानावर घेतली झेप

मुंबई ‘आयआयटी’ ठरली क्यूएस रॅंकिंगमध्ये सर्वोत्तम; १४९ वरून ११८ स्थानावर घेतली झेप

मुंबई : जागतिक विद्यापीठांच्या क्यूएस रॅंकिंगमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी)च्या कामगिरीत सुधारणा झाली असून, संस्था १४९ वरून ११८ व्या स्थानावर पोहोचली आहे. ‘आयआयटीने १०० पैकी ५६.३ गुणांची कमाई करत आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पहिल्या १५० संस्थांच्या यादीत इतकी भरीव कामगिरी आयआयटीने प्रथमच केली आहे. विविध नऊ निकषांवर ‘आयआयटी’ची निवड करण्यात आली आहे.

भारतातील ६१ टक्के विद्यापीठांचे क्यूएस क्रमवारीतील स्थान उंचावले आहे. त्यात दिल्ली ‘आयआयटी’ (१९७ वरून १५०व्या स्थानावर), बंगळुरू ‘आयआयएससी’ (२२५वरून २११ व्या स्थानावर), खरगपूर ‘आयआयटी’ (२७१ वरून २२२व्या स्थानावर), मद्रास ‘आयआयटी’ (२८५वरून २२७वर), दिल्ली विद्यापीठ (४०७वरून ३२८वर) या संस्थांचा समावेश आहे.

एमआयटी सलग १३ व्या वर्षी प्रथम -

अमेरिकेतील ‘एमआयटी’ने सलग १३ वर्षे आपले स्थान अबाधित ठेवत प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या स्थानावर लंडनचे इम्पेरिअल कॉलेज (आधीच्या सहाव्या स्थानावरून दुसऱ्या) आहे. हार्वर्ड आणि ऑक्सफर्डने एकत्रितपणे तिसरा रँक मिळवला आहे. तर केंब्रिज दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरले आहे.

आयआयटी’ची क्यूएसमधील कामगिरी ३१ गुणांनी सुधारली आहे. हे आमच्या शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे यश आहे. - प्रा. शिरीष केदारे, संचालक, आयआयटी

आयआयटीचे गुण-

शिक्षकांची प्रतिष्ठा -  ८६
सायटेशन -  ७९.१
शैक्षणिक प्रतिष्ठा - ५८.५
रोजगारक्षमता - ६४.५
सस्टेनिबीलिटी -  ५२.३
शिक्षक-विद्यार्थी रेशो - १४.४
इंटरनॅशनल फॅकल्टी - ४.३
इंटरनॅशनल रिसर्च नेटव - ५२.३
इंटरनॅशनल स्टुडन्टस - १.३

Web Title: mumbai iit shine in qs world ranking jumped from 149 to 118 position among 150 universities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.