Join us

मुंबई आयआयटीमधील विद्यार्थ्याचे अमेरिकेत घातक बॅक्टेरियावर संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 5:45 AM

मुंबई : आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या सुसांता भौमिक या विद्यार्थ्याला नुकतीच अमेरिकेतील पड्यू विद्यापीठात संशोधनाची संधी मिळाली. विद्यापीठातील प्यूर या उपक्रम संशोधनात जगातील घातक बॅक्टेरियावर संशोधन केल्याचे भौमिकने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पड्यू विद्यापीठाप्रमाणे भारतातही वेगवेगळ्या अभ्यासक्रमांत शिकणाºया विद्यार्थ्यांना संशोधनासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्याची गरजही त्याने या वेळी व्यक्त केली.

‘पर्ड्यू स्नातकपूर्व संशोधन अनुभव’ अर्थात ‘प्यूर’ हा पर्ड्यू व भारत देशाने संयुक्तपणे सुरू केलेला विशेष उपक्रम आहे. ‘पर्ड्यू’ने आयआयटीच्या सहकार्याने सुरू केलेला हा उपक्रम नऊ महिन्यांचा आहे. त्यामध्ये आयआयटी मद्रास, आयआयटी मुंबई व आयआयटी हैदराबाद यांचा समावेश आहे. याअंतर्गत आयआयटी बी.टेक तृतीय वर्षात अव्वल येणाºया विद्यार्थ्याला ‘पर्ड्यू’ताल विद्या शाखेत उन्हाळी संशोधन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळते. बी.टेकसह द्विपदवी घेणारे विद्यार्थीही यास पात्र असतात. त्यात यंदा सुसांत भौमिकला संशोधनाची संधी मिळाली. सुसांता भौमिक आयआयटी मुंबई येथे रसायनशास्त्र पदवी व आॅनर्स या अभ्यासक्रमात चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. सुसांता म्हणाला की, विविध आजारांवर उपलब्ध असलेल्या औषधांना प्रतिकार करणाºया आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नवीन प्रकारच्या औषधांची निर्मिती ही काळाची गरज आहे. त्यासाठी विविध छोट्या अणूंना एकत्रित करून नवीन जीवाणूविरोधी प्रकार तयार करण्यासंबंधी आम्ही काम सुरू केले. या छोट्या अणूंपासून तयार केलेल्या जीवाणूविरोधी घटकांचे सध्या पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत निरीक्षण सुरू आहे. यावर भरपूर अभ्यास केल्यानंतर याबाबत अनेक आश्वासक निकाल मिळाले. गोपनीयतेच्या मुद्द्यामुळे इतक्यात संशोधनाबाबत खुलासा करता येणार नाही. मात्र पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे निकाल आल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल....तर हजारो लोकांचे प्राण वाचतील!‘कृत्रिम सेंद्रिय रसायनशास्त्र व त्याचा उपयोग’ हा माझ्या अभ्यासाचा (स्पेशलायझेशन) विषय आहे. पर्ड्यू विद्यापीठातील एच.सी. सेंटर फॉर बोरेन रिसर्च येथे प्रा. पी.व्ही. रामचंद्रन यांच्या पर्यवेक्षणात काम करण्याचा अनुभव अतुल्य होता. ज्या जीवाणूवर आम्ही काम करत होतो, त्यावर अद्याप लस उपलब्ध नाही. या जीवाणूमुळे अमेरिकेत दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू होतो. तर भारतात मृत्यू पावणाºया रुग्णांची संख्या त्याहून अधिक आहे. त्यामुळे या जीवाणूवर काम करण्याचा अनुभव आयुष्यभराचा ठेवा आहे.- सुसांता भौमिक, विद्यार्थी-आयआयटी मुंबई

टॅग्स :आयआयटी मुंबईमुंबई