India Navy Chopper Accident: भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचे मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यातील तीन क्रू सदस्यांना नौदलाच्या गस्ती जहाजाने वाचवले आहे.
भारतीय नौदलाच्या स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरचे बुधवारी सकाळी मुंबईच्या किनाऱ्याजवळ आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या हेलिकॉप्टरमधील तीनही क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हेलिकॉप्टर मुंबईहून नेहमीच्या प्रवासासाठी निघाल्याची माहिती नौदलाने दिली. सध्या या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने ट्विटद्वारे घटनेची माहिती दिली. 'भारतीय नौदलाचे ALH मुंबईहून नियमित उड्डाण करून समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचल्यानंतर त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.