मुंबई गरम तर उर्वरित महाराष्ट्र थंड! येत्या आठवड्यात किमान तापमान १५ अंश राहणार

By सचिन लुंगसे | Published: January 13, 2024 06:35 PM2024-01-13T18:35:15+5:302024-01-13T18:36:20+5:30

हवामान बदलामुळे मुंबईकरांना गरम होत असल्याचे चित्र आहे.

Mumbai is hot while the rest of Maharashtra is cold minimum temperature will be 15 degrees in the coming week | मुंबई गरम तर उर्वरित महाराष्ट्र थंड! येत्या आठवड्यात किमान तापमान १५ अंश राहणार

मुंबई गरम तर उर्वरित महाराष्ट्र थंड! येत्या आठवड्यात किमान तापमान १५ अंश राहणार

मुंबई: संक्रातीनंतरच्या आठवड्यात राज्यभरातील किमान तापमानाचा पारा सरासरी १५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. त्यामुळे उद्यापासून सुरु होणा-या आठवड्यात थंडीत राज्यातला मुक्काम कायम राहणार असतानाच मुंबईकरांना मात्र बदलत्या हवामानामुळे उन्हाचे चटके बसत आहेत. मुंबईचे कमाल तापमान ३३ तर किमान तापमान २२ अंश नोंदविण्यात आले असून, हवामान बदलामुळे मुंबईकरांना गरम होत असल्याचे चित्र आहे.

दक्षिण भारतातील हिवाळी पावसाचा हंगाम १५ जानेवारीला आटोपण्याची शक्यता आहे. तेथील मान्सून बाहेर पडला की महाराष्ट्रात थंडीसाठी पूरकता वाढते. उत्तर भारतात थंडीची तीव्रता कमी आहे. म्हणून महाराष्ट्रात कडाक्याच्या ऐवजी साधारण थंडी जाणवेल. थंडी संक्रांतीदरम्यान जाणवणार असली तरी १४ पर्यंत महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान १८ म्हणजे सरासरीपेक्षा ४ ने अधिक तर दुपारचे कमाल तापमान ३० म्हणजे सरासरीइतके असु शकते, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
 
धुके का आहे?
पंजाब, हरियाणा, राजस्थानच्या  काही भागात सकाळच्या वेळी धुक्याची चादर तर काही भागात अति नव्हे पण थंडीची लाट जाणवत आहे. म्हणूनच  खान्देशात सकाळच्या वेळी सध्या धुके जाणवत आहे.
 
किमान तापमान अंश सेल्सिसमध्ये

  • अहमदनगर १५.४
  • छत्रपती संभाजी नगर १५.६
  • जळगाव १६.८
  • कोल्हापूर १८.२
  • महाबळेश्वर १६.६
  • मालेगाव १७.६
  • मुंबई २२
  • नांदेड १८.२
  • नाशिक १५.७
  • धाराशीव १९.४
  • परभणी १७.३
  • रत्नागिरी २०.२
  • सांगली १६.९
  • सातारा १५.५
  • सोलापूर २०.९

Web Title: Mumbai is hot while the rest of Maharashtra is cold minimum temperature will be 15 degrees in the coming week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई