Join us

Mumbai: ऐकावे ते नवलच! आता चक्क स्पंजचे मखर

By मनीषा म्हात्रे | Published: September 11, 2023 1:57 PM

Ganesh Mahotsav: गौरी गणपतीच्या निमित्ताने मुंबईच्या मध्यवर्ती  म्हणजे दादरच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. बाजारात कृत्रिम पानांसह ‘स्पंज’सह पुठ्ठ्यांच्या मखरांची विशेष क्रेझ दिसून आली. 

- मनीषा म्हात्रेमुंबई :  गौरी गणपतीच्या निमित्ताने मुंबईच्या मध्यवर्ती  म्हणजे दादरच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. बाजारात कृत्रिम पानांसह ‘स्पंज’सह पुठ्ठ्यांच्या मखरांची विशेष क्रेझ दिसून आली. 

दादरच्या बाजारात १९९५ पासून मखर विक्री करणारे संतोष शिरकाने यांनी सांगितले की, मंदिराच्या मखरांची जागा ओपन आणि फोल्डिंगच्या मखरांनी घेतली आहे. काही वर्षांपूर्वी थर्माकॉलच्या मखरांना मागणी होती. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांत त्याची मागणी घटली. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पुठ्ठा, कापडी मखरांवर भर दिला. मुंबईसह नाशिक, औरंगाबाद या भागातून ही मखरे बनवून घेत आहोत. दीड हजारांपासून २५ हजारांपर्यंत विक्री होत आहे. 

कृत्रिम फुलांकडे कलकृत्रिम पानांच्या जाळ्यांकडे पाठ दाखविल्यामुळे ६०० रूपयाला मिळणारी जाळी ३०० ते ४०० रुपयांत विक्री करत असल्याचे विक्रेता विशाल घाडगे यांनी सांगितले. 

अमेरिका, दुबईसह लंडनमध्येही मखर पाठविण्यात येत आहेत. दरवर्षी दहा मखर परदेशात पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मखर विक्रेत्या ऋणा दाबाडे सांगतात, की थर्माकॉलची मागणी घटल्याने स्पंजचा आधार घेत आकर्षक मखर बनविण्यात येत आहेत. यामध्ये मयूर झुला, युनिक आसन, राजमुद्रासन या मखरांच्या प्रकारासह विविध मंदिरांची प्रतिकृती साकारणारे मखरांची क्रेझ खरेदीदारांमध्ये असल्याचे सांगितले.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई