Mumbai: दहीहंडीला पादचाऱ्यांवर पाणी उडविणे पडणार महागात, मुंबई पोलिसांचा कारवाईचा इशारा

By मनीषा म्हात्रे | Published: September 5, 2023 06:16 PM2023-09-05T18:16:13+5:302023-09-05T18:17:35+5:30

Mumbai News: दहीहंडीला महिलांना पाहून अश्लील टिप्पणी करण्याबरोबरच, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, फुगे उडविणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. साध्या गणवेशातील पोलिसांचा सर्व घडामोडींवर वॉच असणार आहे.

Mumbai: It will be expensive to throw water on pedestrians at Dahi Handi, Mumbai Police warns of action | Mumbai: दहीहंडीला पादचाऱ्यांवर पाणी उडविणे पडणार महागात, मुंबई पोलिसांचा कारवाईचा इशारा

Mumbai: दहीहंडीला पादचाऱ्यांवर पाणी उडविणे पडणार महागात, मुंबई पोलिसांचा कारवाईचा इशारा

googlenewsNext

मुंबई - दहीहंडीला महिलांना पाहून अश्लील टिप्पणी करण्याबरोबरच, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, फुगे उडविणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. साध्या गणवेशातील पोलिसांचा सर्व घडामोडींवर वॉच असणार आहे.

 दहिहंडीच्या उत्सवासाठी शासनाने घातलेल्या अटी, नियमांचे उल्लंघन न करण्याच्या सूचना देत, गोविंदांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच या दहीहंडीच्या उत्सवात साध्या गणवेशातील पोलीस गर्दीत सहभागी होत सर्व घटनांवर लक्ष ठेवणार आहे. दहीहंडीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असून,  शहरातील तब्बल ५ हजार सीसीटिव्ही कॅमऱ्यांसह वॉच टॉवरच्या मदतीने पोलीस सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि जवानांसह केंद्रीय व राज्य राखीव बल, दंगल नियंत्रण पथक, राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), शिघ्रकृती दल, फोर्सवन, बॉम्ब शोधक व नाशक पथक तैनात ठेवण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या गणवेशातील पोलीस गर्दीत सहभागी होणार आहे. तसेच त्यांच्यासाठी विशेष पथकाची नेमणूकही करण्यात आली आहे.

दहीहंडीला सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी फेकणे, अश्लील बोलणे यांमुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील टीका टिप्पणी तसेच, गैरवर्तन, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी किंवा फवारे, रंग किंवा पावडर फेकण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

Web Title: Mumbai: It will be expensive to throw water on pedestrians at Dahi Handi, Mumbai Police warns of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.