Join us

मुंबईत आयटीआयच्या ३,९५२ जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 5:58 AM

दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत राज्यात २९ हजार ९५९ जागा रिक्त राहिल्या आहेत.

मुंबई : दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत राज्यात २९ हजार ९५९ जागा रिक्त राहिल्या आहेत. मुंबईतील रिक्त जागांची संख्या ३,९५२ इतकी आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी राज्यात एकूण १ लाख १८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी प्रवेश घेतला आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (डीव्हीईटी) प्रशासनाने दिली आहे.डीव्हीईटीकडून आयटीआय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी प्रवेश प्रक्रियेचा कालावधी वाढविण्यात आला होता. ही प्रवेश प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. सरकारी आणि खासगी आयटीआय मिळून एकूण एक लाख ४८ हजार २४६ प्रवेश क्षमता आहे. त्यानुसार, एक लाख १८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. २९ हजार ९५९ जागा रिक्त राहिल्या आहेत. यापैकी १९ हजार ९४९ जागा खासगी आयटीआयमध्ये रिक्त राहिल्या आहेत, तर १० हजार १० खासगी जागा रिक्त राहिल्या आहेत. आयटीआयला प्रवेश घेण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद काहीसा घटला आहे. सरकारी आयटीआयमध्ये रिक्त राहिलेल्या जागांची संख्या खासगी आयटीआयच्या तुलनेत कमी आहेत.>असे झाले आयटीआयसाठी प्रवेशविभाग प्रवेशक्षमता प्रवेश रिक्तपुणे ३१,०९८ २३,४२० ३७,६७८अमरावती १८,४१६ १६,२५४ २,१६२औरंगाबाद २०,१२८ १५,८३५ ४,२९३मुंबई २०,९६४ १७,०१२ ३,९५२नागपूर २८,१९६ २२,३५३ ५,८४३नाशिक २९,४४४ २३,४१३ ६,०१३