Mumbai Jumbo Oxygen Plant: लयभारी! मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांट; आता दिवसाला दीड हजार ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 04:28 PM2022-01-17T16:28:24+5:302022-01-17T16:29:14+5:30
Mumbai Jumbo Oxygen Plant: मुंबईतील माहुल येथे जम्बो ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. या प्लांटमधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती केली जाणार आहे.
Mumbai Jumbo Oxygen Plant: मुंबईतील माहुल येथे जम्बो ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. या प्लांटमधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती केली जाणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्यानंतर या ऑक्सिजन प्लांटचं काम मार्गी लागलं होतं.
मुंबईत कार्यान्वित होणारे हे दोन ऑक्सिजन प्लांट म्हणझे कोणत्याही संकटाविरोधात लढणाऱ्या मुंबई स्पिरीटचं अनोखं उदाहरण आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका सज्ज आहे. पण नागरिकांनी नियमांचं पालन करुन कोरोना विरोधातील लढाईत सक्रिय सहभाग घ्यायला हवा, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. तसंच अशाप्रकारचे भव्य प्रकल्प असणारी देशातील पहिली महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची नोंद झाल्याचंही ते म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेआधीच राज्य सरकारनं 'मिशन ऑक्सिजन'ची घोषणा केली होती. त्याचाच एक भाग म्हणून खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील मोठ्या कंपन्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचं आवाहन केलं होतं. याला प्रतिसाद देत भारत पेट्रोलियम कंपनीनं मुंबई महानगरपालिकेच्या मदतीनं जम्बो ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली. या प्लांटमधून सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती केली जाणार आहे.