कोकण मंडळ सदनिका सोडत; 28 जानेवारीपासून अर्जदारांना कागदपत्रं करावीत सादर  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 05:49 PM2019-01-19T17:49:10+5:302019-01-19T17:49:15+5:30

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या ९०१८ सदनिका सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या पात्रता निश्चितीकरिता आवश्यक पुरावे/कागदपत्रे सादर करण्यासाठी २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

Mumbai : Konkan Board House; From January 28, applicants papers submissions will start | कोकण मंडळ सदनिका सोडत; 28 जानेवारीपासून अर्जदारांना कागदपत्रं करावीत सादर  

कोकण मंडळ सदनिका सोडत; 28 जानेवारीपासून अर्जदारांना कागदपत्रं करावीत सादर  

Next

मुंबई - कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या ९०१८ सदनिका सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या पात्रता निश्चितीकरिता आवश्यक पुरावे/कागदपत्रे सादर करण्यासाठी २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत  दररोज ५०० यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. सोडतीतील संकेत क्रमांक २७४ विरार बोळींज (अल्प उत्पन्न गट) व संकेत क्रमांक २७६ बाळकूम ठाणे (मध्यम उत्पन्न गट) या योजनेतील सर्व यशस्वी अर्जदार तसेच टप्पा क्रमांक १ मध्ये राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ज्या यशस्वी अर्जदारांना सहभाग घेता आला नाही अशा अर्जदारांनी पात्रता निश्चित करण्यासाठी या विशेष मोहीमेत सहभागी होऊन आवश्यक कागदपत्रे / पुरावे सादर करावीत, असे आवाहन कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी केले आहे.             

या विशेष मोहिमेत सहभागी होण्यासाठी २१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान सकाळी ११ ते  दुपारी ३ वाजेपर्यंत वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयातील मित्र कक्षातून टोकन दिले जाणार आहे. या टोकन क्रमांकाबरोबर अर्जदारास आवश्यक नमुना पत्रे व चेक लिस्ट दिली जाणार आहे. टोकन मिळवण्यासाठी अर्जदाराने सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जाची प्रत व स्वतःचे ओळखपत्र सोबत आणावे. पात्रतेसाठी आवश्यक नमुना पत्रे व चेक लिस्ट म्हाडाचे संकेतस्थळ https://mhada.gov.in वरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत अर्जदाराने पात्रतेसंबंधी लागणारे कागदपत्रे / पुरावे सादर न केल्यास भविष्यात यशस्वी अर्जदाराला मंडळातर्फे पुन्हा संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही आणि संबंधितांचा अर्ज रद्द करून नियमानुसार प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्याची कार्यवाही करण्यात येईल. 

Web Title: Mumbai : Konkan Board House; From January 28, applicants papers submissions will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा