मुंबई:मुंबईतीलकुर्ला परिसरात चार मजली इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 10 वर पोहोचला आहे. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची चार मजली इमारत काल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली होती. कुर्ल्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात ही दुर्घटना घडली तिथले शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे सध्या इतर बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला आहेत. ही घटना कळताच त्यांनी आणि एकनाथ शिंदेंनी मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर केली.
'माझ्या मतदारसंघात इमारत कोसळते आणि मी तिथे जाऊ शकत नाही', बंडखोर आमदार भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 4:57 PM