Join us

मुंबई एलईडी दिव्यांनी लखलखणार! ८८ हजार पथदिवे बदलणार, विजेचा खर्च किमान ५० टक्के कमी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 4:10 AM

रिलायन्स एनर्जी उपनगरात महानगरपालिकेच्या ८८ हजार पथदिव्यांना वीजपुरवठा करते. हे दिवे सध्या उच्च दाब सोडियम बाष्पाचे आहेत. ते बदलण्यात येणार असून, त्याऐवजी ८८ हजार एलईडीचे दिवे बसविण्यात येणार आहेत.

मुंबई : रिलायन्स एनर्जी उपनगरात महानगरपालिकेच्या ८८ हजार पथदिव्यांना वीजपुरवठा करते. हे दिवे सध्या उच्च दाब सोडियम बाष्पाचे आहेत. ते बदलण्यात येणार असून, त्याऐवजी ८८ हजार एलईडीचे दिवे बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जुलै २०१८ पर्यंत १९ हजार ८०० दिवे बदलण्यात येणार असून, यामुळे ४० टक्के ऊर्जाबचत होईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता मुंबई एलईडी दिव्यांनी लखाखणार आहे.प्राधिकरणांच्या आदेशावरून पथदिव्यांचे कार्यान्वयन केले जाते. रिलायन्स एनर्जीची पथदिवासेवा उपनगरात महानगरपालिकेच्या ८८ हजार पथदिव्यांना पुरविलीजाते. मीरा-भार्इंदर महापालिका१२ हजार पथदिवे आणि उर्वरितसेवा एमएमआरडीए, म्हाडा आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांना पुरविते. सध्या ५५ दशलक्ष युनिट्सचा वापर १ लाख २ हजार पथदिवे प्रकाशित करण्यासाठी केला जात आहे. ४७.४५ दशलक्ष युनिट्सचा वापर ८८ हजार पथदिवे प्रकाशित करण्यासाठी केला जात आहे. हे दिवे महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात.सर्व महापालिकांच्या पथदिव्यांचे एलईडीमध्ये रूपांतरण केले जात आहे. राज्यातील सर्व पथदिवे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पथ दिवे कार्यक्रमांतर्गत बदलण्याची व्यवस्था केली जात आहे.शहरी विकास विभाग आणि एनर्जी एफिशियन्सी सर्विसेस लिमिटेड यांच्यात राज्यातील २० लाख पथदिव्यांचे रूपांतरण एलईडीमध्ये करण्याकरिता करार करण्यात आला आहे. यामुळे ५०० मेगावॅट वीज वाचेल, असा अंदाज आहे. महत्त्वाचे म्हणजे, विजेचा खर्च किमान ५० टक्के कमी होईल, अशी आशा आहे.येथेही लागणार एलईडी दिवेमुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नांदेड यांसह सर्व प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत.

टॅग्स :मुंबई