मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:03 IST2025-04-24T16:00:27+5:302025-04-24T16:03:37+5:30

Mumbai Crime news: महिलेने २४ जानेवारी रोजी नात्यातील एका महिलेला फोन केला. त्यावेळी तिला कळले की, घराला कुलूप असून, देवेंद्रने घराची चावी घरमालकाला दिली आणि तो निघून गेला.

Mumbai: 'Live-in partner gave a hidden threat; The one who was killed fled with gold ornaments | मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Mumbai Crime News: एक महिला जिचा विवाह झाला होता, पण पतीचं निधन झाले. नंतर तिच्या आयुष्यात 'तो' आला. दोघांतील अंतर संपत गेलं आणि ते जवळ आले. नंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. सगळं सुरळीत झालंय असं वाटत असतानाच त्याने तिला गुलिगत धोका दिला. सिनेमाच्या पटकथेसारखी ही घटना घडलीये मुंबईत. महिलेचे सोन्याचे दागिने घेऊन फरार झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलेचे एक लाख ४० हजार रुपयांचे दागिने घेऊन जोडीदार पसार झाल्याचा प्रकार कांदिवली पश्चिमेत घडला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी देवेंद्र गोडबोले (वय २५) याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

महिलेची आरोपीशी कशी झाली होती ओळख

पोईसर येथील होली क्रॉस कॉलनीत राहणाऱ्या तक्रारदार महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे. तिची १४, ११ आणि १० वर्षाची तिन्ही मुले हॉस्टेलमध्ये राहतात. तर, तक्रारदार महिला केअरटेकर म्हणून काम करते. तिची देवेंद्रशी पुण्यात जे. जे. हॉटेल येथे काम करताना ओळख झाली.

... नंतर देवेंद्र हरवल्याची तक्रार केली

पुण्यातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलाला ती आणि देवेंद्र २२ जानेवारी रोजी भेटायला गेले होते. देवेंद्रने तिला तिथे सोडून पुन्हा मुंबईला आला. तिने त्याला घरी पोहोचला की नाही, याबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

वाचा >>तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार

२४ जानेवारीला तिने नात्यातील एका महिलेला फोन केला असता घराला कुलूप असून, देवेंद्रने घराची चावी घरमालकाला देऊन तो निघून गेल्याचे तिला समजले. ती मुंबईला परतली. मात्र, देवेंद्र घरी न आल्याने तिने कांदिवली पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

काही दिवसांनी उघडकीस आला प्रकार

महिलेला पहिल्या पतीने दिलेले जवळपास एक लाख ४० हजार रुपयांचे दागिने देवेंद्रने चोरून नेल्याचे काही दिवसांनी तिच्या लक्षात आले. त्यानुसार तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्या विरोधात बीएनएस कायद्याचे कलम ३०५ (ए) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Mumbai: 'Live-in partner gave a hidden threat; The one who was killed fled with gold ornaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.