मुंबईकरांना खुशखबर मिळणार, AC लोकलचं तिकीट २० ते ३० टक्क्यांनी कमी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 11:04 AM2022-04-29T11:04:11+5:302022-04-29T11:04:45+5:30

राज्यात उष्णतेची लाट असताना मुंबईकरही उकाड्यानं हैराण झाले आहेत. यात मुंबईकरांचा लोकल प्रवास 'गारेगार' करणाऱ्या एसी लोकलचे तिकीट दर आता सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे.

mumbai local ac train ticket fare to be reduced by 20 to 30 percent | मुंबईकरांना खुशखबर मिळणार, AC लोकलचं तिकीट २० ते ३० टक्क्यांनी कमी होणार?

मुंबईकरांना खुशखबर मिळणार, AC लोकलचं तिकीट २० ते ३० टक्क्यांनी कमी होणार?

googlenewsNext

मुंबई

राज्यात उष्णतेची लाट असताना मुंबईकरही उकाड्यानं हैराण झाले आहेत. यात मुंबईकरांचा लोकल प्रवास 'गारेगार' करणाऱ्या एसी लोकलचे तिकीट दर आता सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत एसी लोकलचे दर जवळपास २० ते ३० टक्क्यांनी कमी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त भायखळा रेल्वे स्थानकाला भेट देणार आहेत. याच कार्यक्रमात एसी लोकलचे तिकीट दर कमी करण्याची घोषणा केली जाऊ शकते. 

मुंबईकरांसाठी लाइफलाइन असलेली लोकल अपग्रेड करत पश्चिम आणि मध्य रेल्वेनं एसी लोकल सेवा सुरू केली होती. पण एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जात होती. एसी लोकल सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत असली तरी तिकीट दर जास्त असल्यानं या लोकलला हवातसा प्रतिसाद देखील मिळत नव्हता. तसंच तिकीट दर कमी करावेत अशी मागणी देखील प्रवासी संघटनांकडूनही केली जात होती. 

मध्य रेल्वे प्रशासनानं एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच इतर प्रवाशांचं सर्वेक्षण देखील केलं होतं. यामध्ये सर्व प्रवाशांनी तिकीट दर कमी करण्याची मागणी करण्याचं प्रशासनाला सुचविलं होतं. मध्य रेल्वेकडून पाच हजार प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यामध्ये एसी लोकलबाबत प्रवाशांना प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा ९८ टक्के प्रवाशांनी एसी लोकलचं तिकीट कमी करण्याची मागणी केली होती. यासह एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येण्याची मागणी ९५ टक्के प्रवाशांनी केली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून देण्यात आली होती. आता याच सर्व मागण्यांचा मागावो घेत रेल्वे प्रशासनाकडून तिकटी दरात घट करण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: mumbai local ac train ticket fare to be reduced by 20 to 30 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.