महिन्याच्या पहिल्याच दिवशी ब्लॉक; प्रवाशांनो, वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 06:27 AM2024-08-31T06:27:28+5:302024-08-31T06:27:53+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/ बेलापूर/वाशी सेवा रद्द आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन वेळापत्रक पाहून करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
मध्य रेल्वेवर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान धिम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर वळविण्यात येतील. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर, पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यामुळे सेवा १५ मिनिटांच्या उशिराने धावतील, तर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० या कालावधीत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/ बेलापूर/वाशी सेवा रद्द आहेत.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय सेवा चालविल्या जाणार आहेत, तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.