मुंबईची लोकल तुडूंब भरून वाहते! डिसेंबर २०२३ पर्यंत १३,२२९.५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल

By सचिन लुंगसे | Published: January 10, 2024 07:18 PM2024-01-10T19:18:05+5:302024-01-10T19:18:39+5:30

महत्वाचे म्हणजे २०२२-२३ मध्ये १०७२ दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या ११७४ दशलक्ष होती. यात ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Mumbai local is overflowing! Record revenue of Rs 13,229.50 crore till December 2023 | मुंबईची लोकल तुडूंब भरून वाहते! डिसेंबर २०२३ पर्यंत १३,२२९.५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल

मुंबईची लोकल तुडूंब भरून वाहते! डिसेंबर २०२३ पर्यंत १३,२२९.५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल

मुंबई : मध्य रेल्वेने डिसेंबर २०२३ पर्यंत १३,२२९.५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळवला असून, आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील याच कालावधीतील ११,५७४.५१ कोटी उत्पन्नाच्या तुलनेत महसूलात १४.३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे २०२२-२३ मध्ये १०७२ दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या ११७४ दशलक्ष होती. यात ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवासी महसूलातून मिळालेल्या ५,४००.३९ कोटींच्या उत्पन्नात १५.८३ टक्क्यांची वाढ आहे. २०२२-२३ मध्ये १०७२ दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या ११७४ दशलक्ष होती. यात ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये माल वाहतूकीपासून मिळणारे उत्पन्न ६,८१८.५३ कोटी होते, जे आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या संबंधित कालावधीतील ६,००२.७६ कोटी उत्पन्नापेक्षा १३.५९ टक्क्यांनी जास्त आहे.
--------------
पार्सल आणि साहित्य, तिकीट तपासणी, भाडे व्यतिरिक्त महसूल, वाहनतळ, खानपान, पैसे भरा आणि वापरा, विश्रांती गृह इत्यादींमधून मिळणाऱ्या उत्पन्नासह, कोचिंग व इतर उत्पन्न २०२३-२४ या आर्थिक वर्षात १०१०.५८ कोटी रुपये होते. २०२२-२३ च्या याच कालावधीत प्राप्त झालेल्या ९०९.४० कोटी उत्पन्नाच्या तुलनेत ११.१२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
--------------
डिसेंबरमध्ये काय झाले ?
१४८५.४८ कोटींच्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदा १६७१.३८ कोटी प्रवासी महसूल मिळवला. जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १२.५१ टक्के अधिक आहे. डिसेंबरमध्ये प्रवासी संख्या १३४ दशलक्ष इतकी झाली, जी डिसेंबर २०२२ मध्ये १३१ दशलक्ष होती.
--------------
मालवाहतूकी पासून मिळणारे उत्पन्न
डिसेंबर २०२३ - ८५४.०४ कोटी
डिसेंबर २०२२ - ७९५.४४ कोटी
७.३७ %
--------------
कोचिंग आणि इतर उत्पन्न
डिसेंबर २०२३ - ११६.०५ कोटी
डिसेंबर २०२२ - १०५.३१ कोटी
वाढ १०.१९ % 

Web Title: Mumbai local is overflowing! Record revenue of Rs 13,229.50 crore till December 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.