Join us

Mumbai Local Live: केळवे स्थानकात इंजिन फेल, पश्चिम रेल्वेची मुंबईकडे येणारी सेवा विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 1:48 PM

मुंबईतील लोकल सेवा शहराची 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जाते. मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची लोकल सेवा आहे. दररोज लाखो प्रवासी ...

28 Oct, 24 10:52 AM

केळवे स्थानकात इंजिन फेल

केळवे रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस रेल्वेगाडीचं इंजिन फेल झाल्याने पश्चिम रेल्वेची मुंबईच्या दिशेने येणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. लोकल गाड्या २० ते २५ मिनिटं उशीराने धावत आहेत. या घटनेमुळे वंदे भारत एक्स्प्रेसही रखडली आहे.

12 Jul, 24 02:29 PM

माटुंगा जवळ रेल्वे रुळाला तडा

मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती, यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे

12 Jul, 24 08:14 AM

मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर

पश्चिम रेल्वे १० मिनिटं उशीराने, हार्बर १५ मिनिटं तर मध्य २० मिनिटं उशीराने.

12 Jul, 24 08:01 AM

मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर

पश्चिम रेल्वे १० मिनिटं उशीराने

08 Jul, 24 04:04 PM

कामावरुन घरी परतणाऱ्यांसाठी मोठा दिलासा

कुर्ला-सायन स्थानकादरम्यानचं पाणी ओसरलं, मध्य रेल्वेचे स्लो आणि फास्ट असे दोन्ही ट्रॅक पूर्ववत झाले आहेत. तर हार्बर रेल्वेची सीएसएमटी ते पनवेल वाहतूक देखील सुरू झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक १० मिनिटं उशीराने सुरू आहे. 

08 Jul, 24 03:25 PM

मुंबईत पावसाचा जोर वाढला

मुंबई आणि परिसरात रात्रभरात झालेला पाऊस आणि आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आल्याने मुंबईकरांनी शक्य असल्यास घराबाहेर पडणं टाळणंच आवश्यक आहे. पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

08 Jul, 24 03:24 PM

मुंबईतील पावासाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे वॉर रुममध्ये पोहोचले

08 Jul, 24 11:24 AM

मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटं उशिराने

पावसामुळे मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी वाहतूक ठप्प झाली होती. ती आता पूर्ववत झाली असली तरी वाहतूक २० ते २५ मिनिटं उशीराने सुरू आहे. यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. ठाण्यात प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ७ वरील रेल्वे वाहतूक रद्द करण्यात आली आहे. 

08 Jul, 24 11:22 AM

मुंबईत मुसळधार पावसामुळे हार्बर ठप्प

मुंबईत रात्रभर मुसळधार पावसामुळे हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे सीएसएमटी ते वाशी रेल्वेसेवा अजूनही पूर्णपणे ठप्प आहे. तर वाशी ते पनवेल वाहतूक सुरू आहे. 

03 Jun, 24 11:45 AM

मेगाब्लॉक संपल्यानंतरही प्रवाशांचे हाल

सीएसएमटी स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेवरील वाहतूक २० ते २५ मिनिटं उशीराने

03 Jun, 24 10:03 AM

बोरीवली स्थानकात तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेवची स्लो ट्रॅकवरील वाहतूक विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल १५ ते २० मिनिटं उशीराने

30 May, 24 06:41 PM

मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस 'महा'मेगाब्लॉक!

13 May, 24 12:55 PM

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत (१३ मे २०२४)

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण ते कुर्ला स्थानकादरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

13 May, 24 10:06 AM

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत (१३ मे २०२४)

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण ते कुर्ला स्थानकादरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

01 May, 24 05:20 PM

हार्बर रेल्वे सेवा ठप्प, लोकल रुळावरुन पुन्हा घसरली

सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल पुन्हा एकदा रुळावरुन घसरली आहे. याआधी सोमवारी लोकल रुळावरुन घसरल्याने दुर्घटना घडली होती. यामुळे हार्बर रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर आज त्याचठिकाणी दुरुस्तीनंतर चाचणी सुरू असताना रिकामी लोकल रुळावरुन घसरली आहे. यामुळे हार्बर रेल्वे सेवा आजही ठप्प झाली आहे.

24 Apr, 24 06:54 PM

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

(२४/०४/२०२४): मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली 

04 Apr, 24 03:30 PM

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाकुर्ली दरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटला, यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावरती वळवण्यात आल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे. मुंबईहुन कल्याणकडे आणि कल्याणकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.

28 Mar, 24 01:57 PM

मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कल्याणच्या दिशेने जाणारी मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान पेंटाग्राफ तुटला

13 Feb, 24 09:57 AM

मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने सुरू असल्याने सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलवर प्रचंड ताण, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे

13 Feb, 24 09:54 AM

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, CSMT कडे येणाऱ्या जलद लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने; नोकरदार रखडले

05 Jan, 24 01:14 PM

पश्चिम रेल्वेचा खेळखंडोबा

पश्चिम रेल्वेवरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. अंधेरी येथील गोखले पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेनं वेळापत्रकात बदल केला आहे. पण बदललेल्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांना फारशी काही कल्पना नाही. त्यामुळे चाकरमान्यांचा गोंधळ उडाला आहे. 

11 Dec, 23 12:28 PM

पश्चिम रेल्वेवरील वाहतूक उशिराने

पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे सर्व उपनगरीय लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

18 Oct, 23 05:17 PM

खारकोपर, उरणसह ५ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात; आठवड्याभरात खारकोपर-उरण रेल्वे सेवा सुरू होणार

13 Oct, 23 06:57 PM

पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांचा ब्लॉक

04 Oct, 23 12:50 PM

मुंबई सेंट्रलला लोकल घसरली

मुंबई सेंट्रल स्थानकात लोकल कारशेडमध्ये जात असताना रुळावरुन घसरली, सुदैवाने लोकलमध्ये प्रवासी नव्हते. दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम.

11 Aug, 23 09:24 AM

विरारहून डहाणूकडे जाणाऱ्या गाड्या थांबवल्या, गुजरातकडे जाणारी मालगाडी अडकली

08 Aug, 23 09:49 AM

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

चर्नी रोड-चर्चगेट दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक ५ ते १० मिनिटं उशीराने

05 Aug, 23 07:29 PM

मुंबईत उद्या लोकल सेवेवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक...

03 Aug, 23 01:51 PM

मध्य रेल्वेच्या चेंबूर स्थानकात 'ममता कक्ष' बंद

टॅग्स :मुंबई लोकलमुंबई