Mumbai AC Local: मुंबईकरांना हवाय ठंडा ठंडा कूल कूल प्रवास, सर्वेक्षणात ७६ % प्रवाशांचा कौल एसी लोकलला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 09:14 AM2023-04-17T09:14:07+5:302023-04-17T09:14:35+5:30

Mumbai AC Local: एसी लोकल आम्हाला आवडते... या गाडीचे भाडे फर्स्ट क्लासप्रमाणे असावे... साध्या लोकलला एक तरी एसी डबा असावा... वाहतुकीच्या इतर साधनांपेक्षा लोकलसेवा बेस्ट आहे, ही मते आहेत मुंबईकरांची.

Mumbai Local: Mumbaikars want cool cool cool travel, 76% of passengers prefer AC local in the survey | Mumbai AC Local: मुंबईकरांना हवाय ठंडा ठंडा कूल कूल प्रवास, सर्वेक्षणात ७६ % प्रवाशांचा कौल एसी लोकलला

Mumbai AC Local: मुंबईकरांना हवाय ठंडा ठंडा कूल कूल प्रवास, सर्वेक्षणात ७६ % प्रवाशांचा कौल एसी लोकलला

googlenewsNext

 मुंबई : एसी लोकल आम्हाला आवडते... या गाडीचे भाडे फर्स्ट क्लासप्रमाणे असावे... साध्या लोकलला एक तरी एसी डबा असावा... वाहतुकीच्या इतर साधनांपेक्षा लोकलसेवा बेस्ट आहे, ही मते आहेत मुंबईकरांची. रेल्वेला १७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रवाशांच्या सुरक्षित, सुखकर आणि आरोग्यदायी प्रवासासाठी काय करता येईल, या संदर्भात ऑनलाइन कौल मागविण्यात आला होता. त्याला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

असे प्रश्न, असे उत्तर...
 तुम्ही नियोजित वातानुकूलित रेल्वेला पाठिंबा देता का? : ७६.७ टक्के प्रवाशांनी यास सकारात्मक उत्तर दिले. 
 त्यातील ३९.८ टक्के प्रवाशांनी एसी लोकलचे भाडे हे प्रथम श्रेणी तिकिटाप्रमाणे असावे, अशी मागणी केली. 
 प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये फक्त 
एकच एसी डब्याच्या मागणीला तुम्ही पाठिंबा देता का ? : ७० टक्के प्रवाशांनी पाठिंबा दर्शविला.
 त्यापैकी ४५  टक्के जणांनी एसी लोकलचे भाडे हे प्रथम श्रेणी तिकिटाप्रमाणे असावे, अशी मागणी केली. 
 बस रिक्षा टॅक्सीच्या मुंबईतील इतर वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेचे भाडे खूपच कमी आहे? : यावर ८७ टक्के प्रवाशांनी होकार दिला. 
 उत्तम सुरक्षिततेसाठी तुम्ही एकत्रित एसी आणि एकत्रित महिला कोचच्या बाजूने आहात का? : ७१.२ टक्के प्रवाशांनी होकार दिला.
 उत्तम सुरक्षेसाठी आणि सुरक्षिततेसाठी तुम्ही मेट्रोसारख्या प्रवेश आणि बाह्यगमन  असण्याच्या प्रश्नावर ८७.१ टक्के 
होकार मिळाला. 
 १ ते ४ रेल्वे मार्ग लोकलसाठी 
राखीव ठेवण्यास ९४. २  टक्के जणांनी पाठिंबा दिला.

एसी लोकलला ७६ टक्के मुंबईकरांची पसंती असेल हे मान्य नाही. ठरावीक वेळा सोडल्या, तर एसी लोकल रिकाम्या असतात. एसी लोकलचा सिंगल तिकीट प्रमाणे रिटर्न तिकीट आणि मासिक पास यामध्ये ५० टक्के कपात करावी, तेव्हा ते मुंबईकरांना फायदेशीर ठरेल. 
- सुभाष गुप्ता, 
अध्यक्ष रेल यात्री परिषद.

कित्येक प्रवाशांचे एसी लोकल पास असून, एकाच बाजूने प्रवास करता येतो. घाईच्या वेळी साध्या लोकलने प्रवास करावा लागतो, या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांनी एसी लोकलची संख्या वाढविण्याची मागणी केली. उन्हाळ्यामुळे एसी लोकल वाढविण्याची मागणी प्रवाशांनी 
केली आहे.
- मधू कोटियन, अध्यक्ष,  
मुंबई रेल्वे प्रवासी संघ.

Web Title: Mumbai Local: Mumbaikars want cool cool cool travel, 76% of passengers prefer AC local in the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.